LPG Cylinder : गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडीओ व्हायरल
PM Modi Old Video : गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinnder) दरवाढीनंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधानांनी गॅस दरवाढीवरून विरोधकांवर टीका केली आहे.
PM Modi Old Video on LPG Cylinder : वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं आहे. भाज्यांपासून ते तेलापर्यंत सर्व वस्तंचे भाव वाढताना दिसत आहेत. खाद्य तेल, (Edible Oil) पेट्रोल-डिझेलसह (Petrl Diesel Rate) एलपीजी गॅस सिलेंडरचे (LPG Gas Cylinder) भावही वाढले आहेत. गॅल सिलेंडरचे दर वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांच्यावर वाढलेल्या महागाईवरून हल्ला चढवला होता.
पंतप्रधान मोदी यांच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये मोदी यांनी म्हटलं होतं की, आपण घरात असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरला हात जोडून नमस्कार करायला हवा, असं म्हटलं होतं. दोन दिवसांपूर्वीच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. वाढलेल्या महागाईचं कारण देत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसतात. अशात पंतप्रधानांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2024 में जनता केवल गैस सिलेंडर को ही नही । अपनी मोटरसाइकिल,टेक्सी,कार,किराने की दुकान,लोन देने वाली बैंक,और जो सेलरी आधी हुईं हैं उस ऑफिस को भी नमस्कार करकें जायेगी। pic.twitter.com/YJYRZzgGFD
— Badtiya Ghanshyam (@BadtiyaG) May 7, 2022
एलपीजीवर मोदींचा जुना व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा आहे. या व्हिडीओमध्ये मोदी त्या काळाचा संदर्भ देत आहेत जेव्हा काँग्रेस सरकारने सांगितले होते की, प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ठराविक प्रमाणात गॅस सिलेंडर दिले जातील आणि ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त सिलेंडर हवे असतील त्यांना जास्त पैसे द्यावे लागतील. या व्हिडीओमध्ये मोदी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर गॅस सिलेंडरचे दरवाढीवरून निशाणा साधला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
सधअया सिलेंडरचा भाव 1020 रुपये
व्हायरल व्हिडीओमध्ये महागाईबाबत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, 'तुम्ही महागाईमुळे मरत असाल तरी सरकारला त्याची पर्वा नाही.' दरम्यान, शनिवारी 7 मे रोजी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (14.2 किलो) किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- LPG Price Hike : महागाईचा भडका, घरगुती गॅस सिलेंडर आता 1000 रुपयांच्या पार
- Gold Silver Rate : सोने-चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या आजचे दर
- Petrol-Diesel Prices : कच्च्या तेलानं गाठला विक्रमी उच्चांक; पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार?