एक्स्प्लोर

दिलासादायक! घरगुती ग्राहक हेच सर्वोच्च प्राधान्य, दोन मोठ्या जहाजातून भारतात 92000 टन LPG दाखल होणार

एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच भारतात 92000 टन एलपीजी दाखल होणार आहे.

LPG Gas News : मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने एलपीजी पुरवठ्याबाबत सतर्कता बाळगली आहे. देशातील गॅसची उपलब्धता आणि मागणीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाचे अधिकारी तेल आणि गॅस कंपन्यांसोबत दररोज बैठका घेत आहेत. ज्या ग्राहकांकडे पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) चा पर्याय उपलब्ध आहे, त्यांना एलपीजीवरून पीएनजीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असेही सरकारने सूचित केले आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच भारतात 92000 टन एलपीजी दाखल होणार आहे.

पश्चिम किनारपट्टीवर दोन मोठी एलपीजी जहाजे दाखल होणार

नौवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दोन मोठी एलपीजी जहाजे दाखल होतील. ही जहाजे अंदाजे 92000 टन एलपीजी घेऊन येत आहेत, ज्यामुळे पुरवठ्यावरील ताण काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, इराणकडून कोणत्याही नवीन एलपीजी मालाच्या आगमनाबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

घरगुती ग्राहकांना प्राधान्य

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, घरगुती एलपीजी ग्राहक हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. अलीकडेच सुमारे 58 लाख गॅस सिलेंडरची नोंदणी झाली असून, ती पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या घरगुती गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. ज्या ग्राहकांकडे पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) चा पर्याय आहे, त्यांना एलपीजीवरून पीएनजीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असेही सरकारने सूचित केले आहे. अंदाजे 60 लाख ग्राहक या बदलासाठी पात्र असल्याचा अंदाज आहे. अशा सर्व ग्राहकांना नोंदणीकृत टपालाद्वारे आवाहन पाठवले जाईल.

आयातीवरील अवलंबित्व एक आव्हान

भारताचा एलपीजी पुरवठा मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे, तर पीएनजीच्या बाबतीत परिस्थिती अधिक चांगली आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत पुरवठा कायम ठेवणे हे सरकारसाठी एक आव्हान आहे. सरकारचे म्हणणे आहे की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. येत्या काही दिवसांत, जागतिक परिस्थितीनुसार पुढील धोरण ठरवले जाईल.

इराण-इस्त्रायल युद्धामुळे कतारमधील LNG प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. ज्यामुळे भारतात गॅस टंचाईची भीती निर्माण झाली आहे. कतारकडून होणारा 40 टक्के पुरवठा प्रभावित झाल्याने भारतातील एलपीजी (LPG) आणि खत निर्मिती उद्योगांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. इंधनाचे भाव वाढले असून युरियाची टंचाईही उद्भवू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget