Anantkumar Hegde : लोकसभेला 400 जागा जिंकताच देशाचे संविधान बदलू म्हणणाऱ्या अनंत हेगडेंना भाजपकडून तगडा झटका!
हेगडे अत्यंत वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात, अलीकडेच त्यांच्या विधानामुळे चर्चेत होते. हेगडे यांनी संविधानात बदल करण्याची मागणी केली होती आणि दावा केला होता की ते हिंदू धर्माला अनुकूल नाही.
Lok Sabha polls in Karnataka : भारतीय जनता पक्षाने कर्नाटकमधील (Lok Sabha polls in Karnataka) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे, उत्तरा कन्नड जिल्ह्यातील (Uttara Kannada district) सहा वेळा खासदार असलेले अनंतकुमार हेगडे (Anantkumar Hegde) यांना दणका देत उमेदवारी नाकारली आहे. हेगडे यांनी अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये भाजपला अडचणीत आणलं आहे. हेगडे यांच्याऐवजी भाजपने उत्तरा कन्नड मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना उमेदवारी दिली. कागेरी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत सिसरी मतदारसंघातून पराभूत झाले होते.
हेगडे अत्यंत वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात, अलीकडेच त्यांच्या विधानामुळे चर्चेत होते. हेगडे यांनी संविधानात बदल करण्याची मागणी केली होती आणि दावा केला होता की ते हिंदू धर्माला अनुकूल नाही.
हेगडेंना दणका, अंजली निंबाळकरांचा पेपर सोपा झाला?
दरम्यान, याच उत्तर कन्नड मतदारसंघातून काँग्रेसने गेल्या 70 वर्षात प्रथमच मराठा उमेदवार देत मोठा डाव टाकला आहे. काँग्रेसने खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यात अंजली निंबाळकरांचा (Anjali Nimbalkar) सिंहाचा वाटा आहे. आता या मतदारसंघात काँग्रेसच्या अंजली निंबाळकर विरुद्ध विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्यात लढत होईल. त्यामुळे अंजली निंबाळकर यांचे पारडे जड मानले जात आहे.
काय म्हणाले होते हेगडे?
“भाजपला दोन्ही सभागृहात 400 पेक्षा जास्त जागा मिळणे महत्त्वाचे आहे. अशावेळी आपण घटनेत आवश्यक दुरुस्त्या करू शकू. हिंदू धर्मावर अत्याचार करण्यासाठी याआधी आमच्या संविधानात दुरुस्ती करण्यात आली होती, असे हेगडे यांनी नमूद केले होते. यानंतर देशव्यापी टीकेला भाजपला समोर जावे लागले होते. त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर काही तासांतच भाजपने हेगडे यांच्या विधानापासून फारकत घेतली होती. त्यांच्या ‘वैयक्तिक’ विचारांशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते.
तर सिद्धरामय्या कसाब जयंती करतील
अनंतकुमार हेगडे यांनी आपल्या वक्तव्याने वाद निर्माण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये, भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणाले की सिद्धरामय्या यांना रोखले नाही तर कर्नाटकात कसाब जयंती देखील साजरी करतील, असे वक्तव्य केले होते. अनेक नेत्यांनी त्यांना 'बेजबाबदार' नेता म्हणत सडकून टीका केली होती.
मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री
2017 मध्ये हेगडे यांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून म्हैसूरचा शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करू नये आणि 'क्रूर मारेकरी' आणि 'सामुहिक बलात्कारी' असे संबोधले होते. "क्रूर मारेकरी, दुष्ट धर्मांध आणि सामूहिक बलात्कार करणारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचे गौरव करण्याच्या लज्जास्पद घटनेसाठी कर्नाटक सरकार मला आमंत्रित करू नका, असे ट्विट केले होते. 2016 मध्ये, हेगडे, जे त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते, त्यांनी इस्लामला 'दहशतवादाचा टाइम बॉम्ब' म्हटले आणि ते मिटवले पाहिजे असे म्हटले होते. 'तेजो महालय' नावाचे मंदिर असल्याने शहाजहानने लोकप्रिय ताजमहाल हिंदूंकडून विकत घेतल्याचा दावाही त्यांनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या