एक्स्प्लोर
आता 'ताजमहल'मध्ये रेंगाळता येणार नाही?
नवी दिल्ली: ताजमहल पाहण्यासाठीची वेळ नियंत्रित करण्याची मागणी भारतीय पुरातत्व खात्याने केली आहे. त्यामुळे ताजमहल पाहायला जाणाऱ्या पर्यटकांना आता मर्यादित वेळेतच ताजमहल पाहावा लागणार आहे.
यापुढे पर्यटकांना ताजमहल पाहण्यासाठी 3 ते 4 तासांची वेळ निश्चित केली जाऊ शकते. भारतीय पुरातत्व विभागाने सुप्रीम कोर्टात ही माहिती दिली.
आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. एकदा ताजमहल परिसरात पर्यटकांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना कितीही वेळ आतमध्ये थांबता येतं, त्यामुळे साहजिकच ताजमहल परिसरात मोठी गर्दी होते. ताजमहलमधील गर्दी आवरणं खूपदा सुरक्षा यंत्रणांनाही कठीण जातं.
या सर्व पार्श्वभूमीवर ताजमहल पाहण्याची वेळ नियंत्रित करण्याचा पुरातत्व खात्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास पर्यटकांना निर्धारित वेळेतच ताजमहल पाहावा लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement