एक्स्प्लोर
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लष्करीचा अनंतनागमध्ये खात्मा

जम्मू-काश्मीर: गेल्या महिन्यात काश्मीरमध्ये झालेल्या सहा पोलिसांच्या हत्येचा बदला भारतीय सैन्य दलानं घेतला आहे. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि कुख्यात दहशतवादी बशीर लष्करीचा खात्मा करण्यात आला आहे.
काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यदलानं बशीरसह दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं. आज सकाळी सुरक्षा दलांनी लष्करीसह तीन दहशतवाद्यांना एका घरात घेरले होते. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एका महिलेसमवेत दोन नागरिकांचाही मृत्यू झाला.
गेल्या महिन्यात काश्मीरमधील अचाबल परिसरात एक अधिकारी तसेच पाच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना मारण्याच्या घटनेत बशीर लष्करीसह हे दहशतवादी सहभागी होते. दरम्यान, बुरहान वानी आणि सबझार अहमद बटच्या खात्म्यानंतर भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
