(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत महाराष्ट्रात आघाडीवर तर दिल्ली दुसऱ्यास्थानी, केंद्र सरकारचे प्रत्येक राज्याला पत्र
ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढत होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 1 हजार 431 झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत.
Omicron Cases In india : देशात दिवसेंदिवस ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढत होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ही 1 हजार 431 झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रानंतर दिल्लीमध्ये ओमायक्रॉन रुग्ण सर्वात जास्त आहेत. सध्या महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ही 454 आहे, तर दिल्लीत 351 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ओमायक्रॉनचे 1 हजार 431 रुग्ण असून, त्यापैकी 488 रुग्ण हे बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये दिवसंदिवस ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये देखील ओमायक्रॉनचे 118 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 115, केरळमध्ये 109, राजस्थानमध्ये 69, तेलंगणामध्ये 62, हरियाणामध्ये 37 तर कर्नाटकमध्ये 34 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या मुद्यावर केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला पत्र लिहले आहे. यामध्ये केंद्राने प्रत्येक राज्यांनी कोरोनाचे टेस्टींग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. आरटीपीसीआर च्या ऐवजी रॅपीड आणि एंटीजन टेस्ट करण्याच्या सूचना देखील केंद्र सरकारने राज्यांना केल्या आहेत.
दरम्यान, एकीकडे नव्या वर्षाचं स्वागत सुरु असताना दुसरीकडे कोरोनाचं संकट घोंघावत आहे. कोरोनाचं धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच महाराष्ट्र आणि प्रामुख्याने मुंबईत रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढलेला पाहायला मिळतोय. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. यामध्ये जानेवारी महिन्यात राज्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण दोन लाखांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांमध्ये एक धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. 70 टक्के रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळून आल्यानं प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी पत्रात म्हटले आहे की, ''राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या दोन लाख पार करणार असल्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: