Coronavirus Cases Today: गेल्या 24 तासात देशात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 56 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात देशात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Coronavirus Cases Today : देशात कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 380 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 56 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 67 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला होती. आज या रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे.
दरम्यान, देशात आत्तापर्यंत 4 कोटी 30 लाख 49 हजार 974 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 22 हजार 062 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तस सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 433 आहे. गेल्या 24 तासांत 1,093 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.76 टक्के आहे.
16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली. 19 डिसेंबर 2020 रोजी देशात या कोरोना रुग्णांची संख्या ही एक कोटींहून अधिक झाली होती. गेल्या वर्षी, 4 मे ला बाधितांची संख्या 20 दशलक्ष आणि 23 जून 2021 रोजी ती 30 दशलक्ष पार केली होती. यावर्षी 26 जानेवारी रोजी कोरोनाची रुग्णसंख्या ही चार कोटींच्या पुढे गेली होती.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात 162 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 690 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. राज्यात गेल्या 24 तासात 132 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात काल कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 683 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 99, 13, 632 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. सध्या राज्यात राज्यात 690 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 415 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 53 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.