एक्स्प्लोर

Lakhimpur Kheri violence: लखीमपूर खेरी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, आज महत्वाची सुनावणी

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार आहे.

Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचे टायटल Violence in Lakhimpur Kheri leading to loss of life असे ठेवले गेले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली हेही खंडपीठाचे सदस्य आहेत.

लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषसह अनेक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वास्तविक, अजय मिश्रा यांच्या मूळ गावी दंगलचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.

शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या विरोधात निदर्शने करण्याचे आयोजन केले होते. शेतकरी संघटनांचा आरोप आहे की, जेव्हा शेतकरी तिकोनिया परिसरात आंदोलन करत होते, तेव्हा अजय मिश्रा यांच्या मुलाची गाडी शेतकऱ्यांना चिरडत पुढे गेली. यानंतर हिंसाचार भडकला. या संपूर्ण प्रकरणात चार शेतकऱ्यांसह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की पोलीस आरोपींना अटक न करता त्यांचे संरक्षण करत आहेत. त्यांची मागणी आहे की, पीएम मोदींनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना हटवावे. 

आशिष मिश्रा यांचा घटनास्थळी नसल्याचा दावा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजप नेते अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा संशयाच्या भोवऱ्यात आहे. मात्र, त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना आशिष मिश्रा यांनी एफआयआरबाबत सांगितले की, यूपीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तपासात सत्य समोर येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीसRaj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Embed widget