एक्स्प्लोर

EVM वरील आरोपांची चौकशी व्हावी : अखिलेश यादव

लखनऊ : निवडणुकीचा निकाल स्वीकारत असून, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. जनतेचा कौल मान्य आहे. मात्र, ईव्हीएमवरील आरोपांची चौकशी व्हावी, अशी निवडणूक निकालानंतर उत्तर प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मायावती यांनी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना अखिलेश यादव यांनी याबाबत चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली. दोन युवा नेते एकत्र आले. त्यामुळे यापुढेही काँग्रेससोबत युती कायम राहील, असं अखिलेश यादव यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेससोबत समाजवादी पक्ष पुढे सोबत राहणार की नाही, याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आगामी सरकारने आमच्यापेक्षा चांगलं काम करावं. नवं सरकार 'समाजवादी'पेक्षा चांगलं काम कसं करतं, हे पाहण्यासाठी उत्सुकता आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. त्यामुळे शेतकऱ्याचं कर्ज माफ केल्यास आनंदच होईल, असेही अखिलेश यांनी म्हटलं. आमची 'सायकल' ट्युबलेस आहे, कधीच पंक्चर होत नाही, असे म्हणत अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा काहीसा प्रयत्नही केला. उत्तर प्रदेशात भाजपचं कमळ फुललं ! उत्तर प्रदेशात तब्बल 300 पेक्षा अधिक जागा मिळवत भाजपनं होळीआधीच विजयाची रंगपंचमी साजरी केली. यूपीत ऐतिहासिक विजय मिळवताना भाजपनं अखिलेश यादवांची सायकल पंक्चर केली. तर मायावतींचा हत्ती देखील मोदी लाटेपुढे पुरता निष्प्रभ ठरला. यूपीत 9 जागा मिळवणारा अपना दल  6 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे एकही मुस्लिम उमेदवार न देता भाजपनं मुस्लिमबहुल भागात विजयाचं कमळ फुलवलं आहे. तर दलितबहुल मतदारसंघातही भाजपला मोठं यश मिळालं आहे. नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आणि योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात भाजपनं सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला. दरम्यान, उद्या भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
Advertisement
metaverse

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Embed widget