एक्स्प्लोर

Project Cheetah ला पुन्हा मोठा धक्का; कुनो नॅशनल पार्कमध्ये नववा चित्ता मृत्यूमुखी

कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला असून आतापर्यंत तब्बल 9 चित्ते मृत्यूमुखी पडले आहेत.

Cheetah Dies : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा चित्ते आणि कुनो येथे जन्मलेल्या तीन बछड्यांचा समावेश आहे. आज मरण पावलेला चित्ता मार्च महिन्यापासून मरण पावलेला सहावा प्रौढ चित्ता आहे. मध्य प्रदेश वन विभागानं बुधवारी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. 

कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू

मध्य प्रदेश वनविभागानं म्हटलं आहे की, कुनोतील मादी चित्त्यांपैकी एक चित्ता धात्री आज सकाळी मृतावस्थेत आढळून आली आहे. मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी चित्त्याच्या मृतदेहातं पोस्टमॉर्टम केलं जात आहे. 14 चित्ते कुनोच्या आवारात ठेवण्यात आले आहेत, ज्यामध्ये सात नर, सहा मादी आणि एक मादी बछडा यांचा समावेश आहे. मादी चित्ता अभयारण्यात मुक्तपणे संचार करत आहे, ज्यावर एका टीमद्वारे नजर ठेवली जात आहे. तिला आरोग्य तपासणीसाठी परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही वनविभागानं निवेदनात म्हटलं आहे.

प्रोजेक्ट चित्तामधील नववा चित्ता मृत्यूमुखी

26 जून रोजी कुनो नॅशनल पार्कमधील मोकळ्या जंगलात सूरज चित्ताला मुक्त आवारात सोडण्यात आलं होतं. कुनो नॅशनल पार्कच्या खुल्या जंगलात सोडण्यात आलेला सूरज हा दहावा चित्ता होता. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या 'तेजस' या नर चित्ताचाही 11 जुलै रोजी मृत्यू झाला होता. कुनो पार्क व्यवस्थापनाच्या निरीक्षणादरम्यान हा चित्ता जखमी अवस्थेत आढळून आला. तेजसच्या मानेच्या वरच्या भागात जखमा दिसत होत्या. कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 6 चित्ते आणि 3 बछड्यांचा मृत्यू झाला आहे.     

माजी पर्यावरण मंत्र्यांची मोदी सरकारवर टीका

माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्याच्या मृत्यूमुळे मोदी सरकारवर टीका केली. यावेळी जयराम रमेश म्हणाले की जेव्हा विज्ञान आणि पारदर्शकता मागे पडते तेव्हा असं घडतं.

नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले 

कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्ता पुनरुज्जीवनासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून 20 चित्ते आणण्यात आले होते, परंतु आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे 6 प्रौढ चित्यांचा आणि 3 बछड्यांचा मृत्यू झाला आहे.

सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली होती चिंता

चित्त्यांच्या मृत्यूबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मे महिन्यात झालेल्या सुनावणीत खंडपीठाने चिंता व्यक्त केली होती. केवळ एकाच ठिकाणी चित्तांचा बंदोबस्त करणं योग्य होणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. इतर अभयारण्यातही त्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तसेच, सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी आपण सरकारवर प्रश्न उपस्थित करत नसल्याचं स्पष्ट केले. तसेच, त्यांना फक्त चित्यांबाबत चिंता वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget