एक्स्प्लोर

सर्व शक्ती पणाला लावा, पण कुलभूषण यांचा जीव वाचवा : ओवेसी

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हे सर्वात आधी महत्त्वाचं आहे. मोदी सरकारने आपली सर्व शक्ती पणाला लावून, कुलभूषण जाधव यांना परत आणावं, असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले. लोकसभेत आज कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी काँग्रेस मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विविध पक्षाच्या खासदारांनी आपली मतं व्यक्त केली. राजकारण नको, जीव वाचवा  यावेळी ओवेसी म्हणाले, "मला कुलभूषण जाधवप्रकरणाचं राजकारण करायचं नाही. पाकिस्तानने कायदेभंग करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र या खटल्याबाबतची माहिती सरकारला असायला हवी होती. आता कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवण्याला प्राधान्य हवं. ते आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. सरकाने दबावतंत्र वापरावं. मोदी सरकारने सर्व शक्ती पणाला लावून कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवावा. प्रसंग आंतरराष्ट्रीय दबाव टाकावा. पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने कोणत्याही पुराव्याशिवाय थेट कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षाची सुनावली आहे. पुराव्याशिवाय पाकिस्तानचं नाटक सुरु आहे. मात्र कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं हेच आपलं ध्येय हवं" असं ओवेसी म्हणाले. 'पंतप्रधानांच्या मुलीच्या लग्नाला जाता, आता गप्प का' यावेळी कुलभूषण जाधव मुद्द्यावरुन काँग्रेसने सरकारला चांगलंच धारेवर धरलं. पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुलीच्या लग्नाला जातात. मग आता ते गप्प का. कुलभूषण जाधवांसाठी ते एक फोन करु शकत नाहीत का, असा सवाल काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी विचारला. कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी मोदी सरकारने आवश्यक ती सर्व पावलं उचलायचा हवी. सरकार इतकं गप्प कसं बसू शकतं. आता सरकारने कडक पावलं उचलण्याची गरज आहे, असंही खर्गे म्हणाले. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करा यावेळी भाजपकडूनही सरकारची बाजू मांडण्यात आली. सरकार कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. कुलभूषण जाधव यांच्या पाठिशी संपूर्ण देश उभा आहे. धोकेबाज पाकिस्तानला धडा शिकवू. मोदी सरकार पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. जगभरातूून तसे प्रयत्न सुरु असल्याचं भाजप खासदार म्हणाले. कुलभूषण जाधवांना वाचवण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलू यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. कुलभूषण जाधवांना वाचवण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलू, असं राजनाथ सिंह म्हणाले. "कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्ताननं भारताला विश्वासात घेतलं नाही.   परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज याबाबत दुपारी लोकसभेत सविस्तरपणे निवेदन देतील. कुलभूषण जाधव यांच्याकडे भारताचा पासपोर्ट आढळला, मग ते रॉ एजंट कसे असू शकतात. कुलभूषण जाधव व्यवसायानिमित्त परदेशात गेले होते. मात्र त्यांचं इराणमधून अपहरण झालं", अशी माहिती राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. कोण आहेत कुलभूषण जाधव ? जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात अटक झाली आहे. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो.’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती. बलुचिस्तानात अटक कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. कुलभूषण जाधव यांचं 2016 मध्ये इराणमधून अपहरण करण्यात आलं होतं. मात्र ते पाकिस्तानमध्ये कसे सापडले याचं उत्तर अजूनही पाकिस्तानने दिलेलं नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याने याची माहिती घेण्याचा अधिकार भारताला दिलेला आहे. भारताने 25 मार्च 2016 ते 31 मार्च 2016 या काळात 13 वेळा पाकिस्तानच्या उच्च आयोगाला कुलभूषण जाधव यांच्याविषयी माहिती मागितली. पण पाकिस्तानने त्याला प्रतिसाद दिला नाही. पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना सोमवारी 10 एप्रिलला पाकिस्तानी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.  रावळपिंडी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताचे पाकिस्तानवर ताशेरे कायदा आणि न्यायाचे मुलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असं पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिलं आहे. कोणत्याही वैध पुराव्याशिवाय कुलभूषण जाधव यांना फाशी देणं हास्यास्पद आहे. त्यांच्यावर खटला चालवला जातोय, याची माहिती देखील आतापर्यंत भारताला देण्यात आली नव्हती, अशा तीव्र शब्दात भारताने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत. ठोस पुरावे नाहीत हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानात अटक केलेला भारतीय तरुण कुलभूषण जाधव यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याची कबुली पाकिस्तानने स्वतः दिली आहे. जाधवांविरोधात कुठलेही निर्णायक पुरावे नसल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण सरताज अजीझ यांनी स्पष्ट केलं होतं. मार्च महिन्यात बलुचिस्तानातून कुलभूषण जाधव यांना रॉ एजंट असल्याच्या आरोपातून पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. भारतीय हेर कुलभूषण जाधवबाबत असलेल्या कागदपत्रांमध्ये निव्वळ काही विधानं आहेत, कोणतेही पुरावे नाही, असं अजीझ यांनी पाकिस्तानच्या सिनेटमध्ये सांगितलं होतं. संबंधित बातम्या: … तर आम्ही ही पूर्वनियोजित हत्या समजू, भारताने पाकला खडसावलं कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका रद्द हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget