एक्स्प्लोर

धक्कादायक : राजस्थानमध्ये एका महिन्यात 100 बालकांचा मृत्यू

राजस्थानमध्ये इतक्या मोठया प्रमाणात बालकं दगावल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही याची गंभीरपणे दखल घेतली आहे. त्यांनी तातडीनं याबाबतची नाराजी सरकारला कळवली आहे. शिवाय राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनाही चौकशीसाठी पाचारण केलं.

नवी दिल्ली : देशात मृत्यू इतका स्वस्त झालाय की त्याला रस्ते, लोकल, चेंगराचेंगरी अशी कुठलंही कारणं पुरतात. शिवाय यात निर्ढावलेल्या व्यवस्थेकडून वयोगटाचाही कुठला भेद दिसत नाही. राजस्थानमध्ये एका महिन्यात तब्बल 100 बालकांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन जोरदार राजकारणही सुरु झालं आहे. राजस्थानमधल्या हॉस्पिटलमध्ये एका महिन्यांत तब्बल 100 बालकांचा मृत्यू झाला आहे. कोटामधल्या जे के लोन या हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांत येथे 8 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीही 23-24 डिसेंबर या दोन दिवसांत येथे दहा बालकं दगावली होती. राहुल, प्रियंका गांधी यांना भेट देण्यासाठी कोटा हे काही दिल्लीपासून फार लांब नाही असा टोला भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी लगावला आहे. भाजपकडून टीका झाल्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्याबद्दल ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं आहे. अशोक गेहलोत ट्वीटमध्ये म्हणाले, कोटा येथील जेके लोन हॉस्पिटलमध्ये आजारी बालकांच्या मृत्यूबद्दल सरकार संवेदनशील आहे. यावर राजकारण होऊ नये. कोटाच्या  रुग्णालयात बालमृत्यू सातत्याने कमी होत आहेत. आम्ही ते आणखी कमी करण्याचा प्रयत्न करू. माता व मुले निरोगी राहणे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्याच गोरखपूर मतदारसंघात ऑक्सिजन पुरवठयाअभावी बालकं दगावल्याची घटना समोर आली होती. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता काँग्रेसच्या सरकारमध्येही बालकांचा मृत्यू होत असल्यानं त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. राजस्थानमध्ये इतक्या मोठया प्रमाणात बालकं दगावल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही याची गंभीरपणे दखल घेतली आहे. त्यांनी तातडीनं याबाबतची नाराजी सरकारला कळवली आहे. शिवाय राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनाही चौकशीसाठी पाचारण केलं. काही बालकं ही जन्मताच वजनानं कमी असल्यानं दगावल्याचं तोकडं स्पष्टीकरणही देण्यात येत आहे. पण मुळात गर्भवती महिलांसाठी अनेक योजना सुरु असताना त्या गरजवंतांपर्यंत पोहचत नाहीत का? असाही सवाल त्यातून उपस्थित होत आहे. त्यामुळेच आता इतक्या संवेदनशील विषयात तरी सरकारं कारणं बाजूला ठेवत तातडीनं गंभीर कार्यवाही सुरु होईल हीच अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Gitanjali Angmo : 'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
'कधी चीनचा एजंट तर कधी संघी..., मोदी आणि राहुल गांधींना टॅग करत गीतांजली आंग्मो संतापल्या
E20 Petrol : पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
पेपरफुटी आंदोलनाच्या यशानांतर आता E 20 पेट्रोलचा मुद्दा; अरविंद केजरीवाल आंदोलन छेडण्याच्या तयारीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget