एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेसचे 7, जेडीएसचे 4 आमदार भाजपच्या संपर्कात?
बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना कर्नाटकाबाहेर धाडणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक - बंगळुरु: काँग्रेसचे सात आणि जेडीएसचे चार आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना कर्नाटकाबाहेर धाडणार आहे. त्यातच केरळ पर्यटनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या, मात्र त्यानंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं.
आपल्याकडे 118 आमदारांचं बळ असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. काँग्रेस (78), जेडीएस (38) यांचे 116 आमदार असून
दोन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने जेडीएससोबत सत्ता स्थापन करण्याचा विश्वास काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या पाठिंब्याने जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला. त्याआधी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांच्या अवधीची मागणी भाजपने केली आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकचे राज्यपालच खरे किंगमेकर ठरणार आहेत.
काँग्रेसचे सात आणि जेडीएसचे चार आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास संबंधित काँग्रेस आमदार तयार नसल्याची माहिती आहे. हे सातही आमदार लिंगायत समाजातील आहेत.
केरळ पर्यटनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'राजकीय उलथापालथ करणाऱ्या निवडणुकांनंतर आम्ही सर्व आमदारांना केरळमधील सुरक्षित आणि सुंदर रिसॉर्टमध्ये आमंत्रित करत आहोत.' असं ट्वीट करण्यात आलं होतं. मात्र टीकेनंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं आहे.
गुजरात राज्यसभा निवडणुकांनंतर फोडाफोडी रोखण्यासाठी काँग्रेसने आमदारांना बंगळुरुतील रिसॉर्टमध्ये नेलं होतं. त्यातच कर्नाटक विधानसभेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार, हे साहजिकच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement