एक्स्प्लोर
मिठी मारल्याने शाळेतून काढलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी थरुर
आपण अभिनंदन करण्यासाठी संबंधित विद्यार्थिनीला मिठी मारल्याचा दावा विद्यार्थ्याने केला होता. मात्र शाळेने तो मान्य केला नाही.
तिरुअनंतपुरम : मिठी मारल्यामुळे शाळेतून काढून टाकलेल्या दोघा विद्यार्थ्यांच्या पाठीशी काँग्रेसचे खासदार शशी थरुर उभे राहिले आहेत. थरुर यांच्या मध्यस्थीनंतर सेंट थॉमस शाळेने दोन्ही विद्यार्थ्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एका स्पर्धेत विजयी झाल्यानंतर सेंट थॉमस स्कूलमध्ये बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अकरावीतील विद्यार्थिनीला मिठी मारली होती. 'प्रेमाचं जाहीर प्रदर्शन' असल्याचं सांगत शाळेने दोघांना निलंबित केलं होतं. यानंतर सोशल मीडियामध्ये या प्रकरणाची चर्चा रंगली होती.
आपण अभिनंदन करण्यासाठी संबंधित विद्यार्थिनीला मिठी मारल्याचा दावा विद्यार्थ्याने केला होता. मात्र शाळेने तो मान्य केला नाही. दोन्ही विद्यार्थ्यांनी या कृत्याबद्दल शाळेकडे माफीनामाही मागितला होता. मात्र शाळा प्रशासन त्यांच्या निलंबनाच्या निर्णयावर ठाम होतं.
शशी थरुर यांनी शाळेच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला होता. शुक्रवारी शाळेचं व्यवस्थापन मंडळ, संबंधित विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्यासोबत थरुर यांनी सभा घेतली. या प्रकरणी पुनर्विचार करण्याचा आणि विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला बसू देण्याचं थरुर यांनी सुचवलं. सभेत सकारात्मक तोडगा निघाला असून शाळेने दोन्ही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्याची हमी दिली.
आपल्या मुलाचा शिक्षणाचा हक्क डावलल्यामुळे विद्यार्थ्याचे पालक हायकोर्टात जाण्याच्या तयारीत होते. मात्र शाळेने मुलाच्या कुटुंबाला तसं न करण्याची विनंती केल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement