एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सौंदर्य आणि अश्लीलता पाहणाऱ्याच्या नजरेत : केरळ हायकोर्ट
'सौंदर्य आणि अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते' असं सांगत केरळ हायकोर्टाने स्तनपान करणाऱ्या मॉडेलच्या फोटोला आक्षेप घेणारी याचिका फेटाळून लावली.
तिरुअनंतपुरम : 'गृहलक्ष्मी' या मल्ल्याळम मॅगझिनच्या कव्हर पेजवर स्तनपान करणाऱ्या मॉडेलच्या फोटोला आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्याला केरळ हायकोर्टाने चपराक लगावली आहे. 'सौंदर्य आणि अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते' असं सांगत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
'एकासाठी जे आक्षेपार्ह आहे, ते दुसऱ्यासाठी कलात्मक असू शकतं. एखाद्या व्यक्तीला जे अश्लील वाटतं, त्यात दुसऱ्याला सौंदर्य दिसू शकतं. शेवटी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं' असं सांगत माजी सरन्यायाधीश जस्टिस अँटनी डॉमिनिक, दामा शेषाद्री नायडू यांच्या खंडपीठाने फेलिक्स एमए यांची याचिका फेटाळून लावली.
'मॅगझिनच्या कव्हर पेजवर असलेल्या स्तनपान करणाऱ्या मॉडेलच्या फोटोमध्ये काहीही बिभत्स किंवा आक्षेपार्ह नाही. राजा रवी वर्मांसारख्या कलाकारांच्या चित्रांकडे आम्ही ज्या नजरेने पाहतो, त्याच नजरेने आम्ही या फोटोकडे पाहिलं. जसं पाहणाऱ्याच्या नजरेत सौंदर्य असतं, तशीच अश्लीलताही असते' असं निरीक्षण खंडपीठाने नोंदवलं.
'गृहलक्ष्मी' या मल्याळम मासिकाच्या फेब्रुवारी महिन्याच्या कव्हर पेजवर मॉडेल नवजात बाळाला स्तनपान करताना गिलू जोसेफ झळकली आहे. गिलू जोसेफ एक कवयित्री, लेखिका आणि एअरहोस्टेस आहे. "स्तनपान करत असताना आम्हाला रोखून पाहू नका." या मॅगझिनच्या कव्हर पेजवर लिहिलं आहे.
"स्तनपान हे एका आईला मिळालेलं वरदान आहे. जर एखादी महिला आपल्या बाळाला दूध पाजत असेल तर त्यात लाज वाटण्याची गोष्ट नाही. या गोष्टीकडे लैंगिकदृष्ट्या पाहणं चुकीचं आहे. हे चुकीचं/अयोग्य आहे, असा विचार तुम्ही का करता? जर तुम्ही तुमच्या बाळाला सार्वजनिक ठिकाणी दूध पाजत असाल तर कोणता देव तुमच्यावर नाराज होईल?" असं गिलूने फेब्रुवारीत दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
या फोटोमुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला होता. स्तनपानाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मॉडेलला घेण्याची काय गरज होती? विशेष म्हणजे तिच्या कडेवरचं बाळही तिचं नाही, मग या फोटोशूटचा उद्देश नेमका काय? असे सवाल उपस्थित करण्यात आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
भारत
Advertisement