एक्स्प्लोर

Kartarpur Sahib News: करतारपूर गुरुद्वारा पुढील महिन्यापासून शीख यात्रेकरूंसाठी खुला होणार; पाकिस्तानने 'या' अटी घातल्या

Kartarpur Sahib News: करतारपूर गुरुद्वारा उघडण्याचा निर्णय नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरने (एनसीओसी) शनिवारी घेतला. 22 सप्टेंबर ही शीख संप्रदायाचे संस्थापक गुरु नानक देव यांची पुण्यतिथी आहे.

Kartarpur Sahib News: पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने शीख यात्रेकरूंसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यापासून, पाकिस्तान कोरोनाव्हायरस लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या यात्रेकरूंना गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूरला भेट देण्यास परवानगी देईल.

करतारपूर गुरुद्वारा उघडण्याचा निर्णय नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरने (एनसीओसी) शनिवारी घेतला. 22 सप्टेंबर रोजी शीख संप्रदायाचे संस्थापक गुरु नानक देव यांची पुण्यतिथी आहे.

डॉन वृत्तपत्राच्या बातमीनुसार, एनसीओसीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, कोविड -19 पासून प्रतिबंध करण्याच्या नियमांचे पालन करून, शीख यात्रेकरूंना पुढील महिन्यापासून करतारपूरला जाण्याची परवानगी दिली जाईल. उल्लेखनीय म्हणजे, कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे भारताला 22 मे ते 12 ऑगस्ट दरम्यान 'क' वर्गात ठेवण्यात आले होते आणि तेथून येणाऱ्या लोकांना विशेष मंजुरीची आवश्यकता होती.

आता, लोकांना लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र आणि गेल्या 72 तासांत केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल दाखवून पाकिस्तानात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, विमानतळांवर अँटीजेन चाचणी देखील केली जाईल. जर कोणी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले तर त्या प्रवाशाला पाकिस्तानात प्रवेश दिला जाणार नाही.

दरबार साहिबमध्ये जास्तीत जास्त 300 लोकांना एकत्र येण्याची परवानगी आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 3,842 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, त्यानंतर एकूण प्रकरणे वाढून 11,23,812 झाली आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget