(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Muslim Student Confronts Professor: विद्यार्थ्याला म्हटलं दहशतवादी, कर्नाटकातील प्राध्यापक निलंबित
Muslim Student Confronts Professor: कर्नाटकातील मणिपाल विद्यापीठातील एका प्राध्यापकाला वर्गात मुस्लिम विद्यार्थ्याला दहशतवादी म्हटल्याबद्दल निलंबित करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Muslim Student Confronts Professor: कर्नाटकातील मणिपाल विद्यापीठातील (Manipal University) एका प्राध्यापकाला (Professor) वर्गात मुस्लिम विद्यार्थ्याला दहशतवादी (Terrorist) म्हटल्याबद्दल निलंबित करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडीओ (Viral Video) देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्राध्यापकाने दहशतवादी म्हटल्यानंतर विद्यार्थ्याने (Student) यावर आक्षेप घेतला. या व्हिडीओत प्राध्यापक विद्यार्थ्याला म्हणताना दिसत आहे की, ''तू तर माझ्या मुला सारखा आहे.'' यावर विद्यार्थी म्हणतो की, ''नाही, कोणताही वडील आपल्या मुलासाठी असे शब्द वापरणार नाही. हा विनोद नाही. मुस्लिम असल्यामुळे असे टोमणे कधीतरी ऐकावे लागतात. हे अजिबात गमतीशीर नाही.'' कर्नाटकातील (Karnataka) उडीपी येथील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (Manipal Institute of Technology) शुक्रवारी ही घटना घडली आहे.
व्हिडीओत प्राध्यापक पुन्हा विद्यार्थ्याला म्हणताना दिसत आहे की, ''अरे तू माझ्या मुला सारखा आहेस.'' यावर संतप्त विद्यार्थी पुन्हा बोलतो की, तुम्ही तुमच्या मुलाशीही असेच बोलता का? त्याला तुम्ही दहशतवादी नावाने हाक माराल का? इतक्या लोकांसमोर तुम्ही माझ्याशी असं कसं बोलू शकता. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही अशी भाषा वापरू शकत नाही.'' यानंतर प्राध्यापक या विद्यार्थ्यांची माफी मागतात.
पूरा वीडियोpic.twitter.com/AN7WKuIjeN
— Swati Mishra (@swati_mishr) November 28, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तरी याप्रकरणी पोलिसात (Police) तक्रार दाखल झालेली नाही. मात्र विद्यापीठानेच (University) या प्रकरणाची दखल घेत प्राध्यापकाला निलंबित केले आहे. त्यांच्या वतीने चौकशी समितीही स्थापन करण्यात आली असून ती या प्रकरणाची चौकशी करत आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण वर्ग घेऊ शकत नाही, असे प्राध्यापकांना सांगण्यात आले आहे. प्राध्यापकाने विद्यार्थ्याला दहशतवादी (Terrorist) का म्हटले, कोणत्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडीओ (Video) कोणी शूट केला हे देखील कळू शकलेले नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: