एक्स्प्लोर
पत्नीच्या हत्येनंतर 11 दिवसात 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा

बंगळुरु : 65 वर्षीय पत्नीच्या हत्येप्रकरणी 75 वर्षीय पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर अवघ्या 11 दिवसांमध्ये कर्नाटक कोर्टाने आरोपीला शिक्षा ठोठावली. चारित्र्यावर संशय घेऊन 75 वर्षीय पती चेन्नबसय्या यांनी पत्नी पुतम्मा यांची हत्या केली. कर्नाटकातील चित्रदुर्ग तालुक्यात वळसे गावामध्ये 27 जून रोजी ही घटना घडली होती. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर त्याच दिवशी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. सुरुवातीला पतीने हत्येमागे आपला हात असल्याचा इन्कार केला होता, मात्र पोलिसांच्या चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. घटनेच्या दोनच दिवसांनी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. फॉरेन्सिक सायन्स विभागाने कोर्टात अहवाल सादर केला. त्यानंतर सेशन्स कोर्टाने शनिवारी निकाल जाहीर केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























