एक्स्प्लोर

कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकार टिकणार की कोसळणार? आज फैसला!

कर्नाटक पोटनिवडणुकीत अथणी, कागवाड, गोकाक, येलापूर, हिरेकेरुर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबल्लापूर, के.आर. पुरा, यशवंतपुरा, महालक्ष्मी लेआऊट, शिवाजीनगर, होसाकोट, के.आर. पेटे, हुनसूर जागांवर मतदार झालं आहे.

बंगळुरु : कर्नाटकमध्ये 15 विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल तर दुपारपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालावर अवघ्या चार महिन्यांपूर्वीच स्थापन झालेल्या येडियुरप्पा सरकारच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. पोटनिवडणुकीत भाजपला कमीत कमी सहा जागांवर विजय आवश्यक आहे, जेणेकरुन सभागृहात बहुमत कायम राहिल. कर्नाटक पोटनिवडणुकीत अठानी, कगवाड, गोकाक, येलापूर, हिरेकेरुर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबेलापुर, के.आर. पुरम यशवंतपुरा, महालक्ष्मी लेआऊट, शिवाजीनगर, होसाकोटे, के.आर. पेटे, हुनसूर जागांवर मतदार झालं आहे. कर्नाटकमध्ये 6 डिसेंबरला 15 विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. तर आज (9 डिसेंबर) सकाळी मतमोजणी होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 61 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. कर्नाटकमध्ये मतदानानंतर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला 15 पैकी 9 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. जर असेच निकाल आले तर भाजप सरकारच्या डोक्यावर संकट निघून जाईल. मात्र 6 पेक्षा कमी जागांवर विजय मिळाला तर राज्यात पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण होईल. या 15 पैकी 12 जागा काँग्रेस तर 3 जागा जेडीएसने जिंकल्या होत्या. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत. काँग्रेसचे 66 आणि जेडीएसचे 34 आमदार आहेत. याशिवाय बसपाचाही एक आमदार आहे. या निकालावर काँग्रेसचीही नजर आहे. कारण काँग्रेसच्या नेत्यांनी जेडीएससोबत पुन्हा एकदा युतीचे संकेत दिले आहेत. निकालानंतर बहुतांश गोष्टी बदलतील, असं बी.के. हरीप्रसाद म्हणाले. बी एस येडियुरप्पा यांचं सरकार सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेस-जेडीएस सरकारमधील काँग्रेसच्या 14 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. परिणामी सरकार कोसळलं होतं. माजी विधानसभा अध्यक्षांनी सर्व बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं होतं. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 15 जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली. तर दोन जागांबाबत हायकोर्टात खटला सुरु आहे. दरम्यान, विजयासाठी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी भगवान मंजूनाथ मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. येडियुरप्पा यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आणि पुढील साडेतीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी विशेष पूजा-अर्चाही केली. याशिवाय 15 पैकी 13 जागा भाजपला मिळतील तर उर्वरित दोन जागा काँग्रेस आणि जेडीएसला मिळतील, असा दावा त्यांनी केला. तसंच काँग्रेस आणि जेडीएस प्रशासन चालवण्यासाठी आमची मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला, तर दुसरीकडे जेडीएसचे नेते आणि माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांनीही शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी लीन झाले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे विधानपरिषद सदस्य टी ए श्रवण उपस्थित होते. (येडियुरप्पांनी सरकार स्थापन केला तेव्हाचा व्हिडीओ)

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget