Karnataka : कर्नाटक पोलीस भरतीमध्ये 'ट्रान्सजेंडर'साठी कोटा निश्चित, सरकारच्या निर्णयाचं होतंय कौतुक
Karnataka Brings In Job Quota In Police For Transgenders : राज्यात प्रथमच 'ट्रान्सजेंडर' साठी 79 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. ट्रान्सजेंडर समुदायाने यासाठी कर्नाटक सरकारचे कौतुक केले आहे.
Karnataka Brings In Job Quota In Police For Transgenders : राज्यासाठी प्रथमच, कर्नाटक सरकारने (Karnataka Government) राज्य सशस्त्र दलातील भरतीमध्ये 'ट्रान्सजेंडर' (Transgender) साठी आरक्षण जाहीर केले आहे. राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, कर्नाटक सशस्त्र दलात 3,484 पदे भरण्यासाठी कॉन्स्टेबलची भरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात प्रथमच 'ट्रान्सजेंडर' साठी 79 पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. ट्रान्सजेंडर समुदायाने यासाठी कर्नाटक सरकारचे कौतुक केले आहे.
Yes. You read it right! Karnataka State Police is an equal opportunity organisation. We are recruiting men, women and even transgenders. pic.twitter.com/HhM3RtxpQv
— DGP KARNATAKA (@DgpKarnataka) December 21, 2021
ट्रान्सजेंडर समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी..
राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, पोलीस खात्यातील सर्व भरतींमध्ये ट्रान्सजेंडरना एक टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील पूर्वग्रह दूर करून ट्रान्सजेंडर समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस विभागाने हा निर्णय घेतल्याचे सूद म्हणाले. ते म्हणाले, आम्ही सर्व श्रेणींमध्ये ट्रान्सजेंडरसाठी एक टक्का पद राखीव ठेवले आहे. मला वाटते की यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल.
ऑनलाईन फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख
मंत्री ज्ञानेंद्र म्हणाले की, एकूण रिक्त पदांपैकी 420 पदे 'कल्याण कर्नाटक' प्रदेशातील उमेदवारांसाठी किंवा हैदराबाद-कर्नाटक प्रदेशातील उमेदवारांसाठी राखीव आहेत, त्यापैकी 11 पदे 'ट्रान्सजेंडरसाठी आहेत. ज्ञानेंद्र म्हणाले की, उर्वरित कर्नाटकात 3,064 पदांची भरती केली जाईल, त्यापैकी 68 ट्रान्सजेंडरसाठी राखीव आहेत. ही भरती अत्यंत पारदर्शक पध्दतीने होणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढाकार स्वागतार्ह आहे.
ट्रान्सजेंडर्सच्या समुदायासाठी काम करणारे कार्यकर्ते अक्काई पद्मशाली यांनी सांगितले की, मी या निर्णयाचे स्वागत करतो. सरकारच्या घोषणेनुसार ट्रान्सजेंडर्सना मुख्य प्रवाहात आणण्याचा उपक्रम स्वागतार्ह आहे
ट्रान्सजेंडर वेल्फेअर बोर्ड स्थापन करण्याची मागणी
ट्रान्सजेंडर्सच्या समस्येबाबत पद्मशाली म्हणाल्या की, एखाद्याला पोलि स खात्यात रुजू व्हायचे असेल, तरी त्यासाठी काही पात्रता आवश्यक असते. येथे आपल्यापैकी बहुतेक ट्रान्सजेंडर निरक्षर आहेत आणि त्यांनी शाळा सोडली आहे. 10वी उत्तीर्ण देखील नाही, महाविद्यालयीन पदवी नाही. यामागे अनेक बारकावे आहेत. 'जोगप्पा', 'मारला', 'जोगता', 'शक्ती' आणि 'अक्का' यांसारख्या ट्रान्सजेंडर समुदायातील विविध "सांस्कृतिक ओळख आणि अस्तित्वांची विविधता" समजून घेण्याचीही गरज आहे, असे पद्मशाली यांनी सांगितले. समाजाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी 'तत्काळ सर्वेक्षण' करण्याचे आणि त्यांच्या कल्याणासाठी 'ट्रान्सजेंडर कल्याण मंडळ' स्थापन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.