एक्स्प्लोर

Why Congress Won Karnataka: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय का? जाणून घ्या कारणे

Why Congress Won: कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसला हा विजय सहजासहजी मिळाला नाही.

Why Congress Won Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. राज्यात आता काँग्रेस स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करणार आहे. हिमाचल प्रदेशनंतर आता  काँग्रेसने कर्नाटकमध्ये विजय मिळवल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. काँग्रेसने हा विजय मिळवला असला तरी त्यांच्यासमोरील आव्हाने मोठी होती. 

काँग्रेसच्या विजयाची कारणे काय?

40 टक्के कमिशन सरकार: कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ताधारी भाजपविरोधात 40 टक्के कमिशनखोरीचा मुद्दा उचलला. प्रचारात हा मुद्दा अग्रस्थानी होता. मुख्यमंत्री बोम्मई यांचे सरकार 40 टक्के कमिशनचे सरकार असल्याचा आरोप केला. तर 'पे सीएम' नावाची मोहीम राबवली. यातून सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे लोकांपर्यंत पोहचवली. कर्नाटकमधील वृत्तपत्रांमध्ये काँग्रेसने भ्रष्टाचाराचे दरपत्रकही जाहीर केले. त्यातून हा मुद्दा अधिक ठळकपणे लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. 

पाच आश्वासने: काँग्रेसने निवडणूक प्रचारात पाच महत्त्वाची आश्वासने दिली. काँग्रेसचे सरकार आल्यास 'गृह ज्योती' योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत कुटुंब चालवणाऱ्या गृहिणींनी दरमहा 2000 रुपये दिले जातील. सरकार येताच सर्व महिलांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. तरुणांवर लक्ष केंद्रित करून, पक्षाने पदवीधर तरुणांना दरमहा 3,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले. तर डिप्लोमाधारकांना दरमहा 1500 रुपये दिले जातील, अशी घोषणा केली होती. काँग्रेसने अन्न भाग्य योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती 10 किलो तांदूळ देण्याचे वचन दिले. ही आश्वासने पक्षासाठी महत्त्वाची ठरली. मतांमध्येही मोठा परिणाम दिसून आला. त्याचा परिणाम निकालावर स्पष्टपणे दिसून येत आहे. काँग्रेसच्या या आश्वासनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रेवडी संस्कृती’ म्हणत टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पक्षाने बड्या उद्योगपतींच्या कर्जमाफीचा आरोप करत त्याचा लाभ सर्वसामान्यांना का मिळू नये, असा सवाल काँग्रेसने केला. 

पक्षांतर्गत एकजूट: कर्नाटक काँग्रेसमध्ये सिद्धरमैय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचे दोन मुख्य गट असल्याचे म्हटले जाते. निवडणुकीच्या आधी पक्षातंर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान काँग्रेसच्या नेतृत्वासमोर होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या 'भारत जोडो' यात्रेत दोन्ही नेत्यांना एकत्र ठेवण्यात आले होते. राहुल गांधी यांच्यासोबत दोन्ही नेते एकत्र होते. निवडणूक प्रचारातही दोन्ही नेते एकत्र होते. प्रचारपत्रकांपासून ते पोस्टर, जाहिराती, सभांमध्ये दोन्ही नेत्यांना ठळक स्थान देण्यात आले होते. 10 मे रोजीच्या मतदानापूर्वी  दोन्ही नेत्यांचा एक व्हिडीओ जारी करण्यात आला. या व्हिडीओत दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधत प्रश्नोत्तरे करत असल्याचे दिसून आले. यातून पक्ष हा एकजूट असून सरकार आल्यास अस्थिरता राहणार नसल्याचे संदेश मतदारांना देण्यात आला. 

आक्रमक प्रचार: काँग्रेसने आक्रमक प्रचार केला. स्थानिक वॉर्डपासून ते सोशल मीडियापर्यंत काँग्रेसने जोरदार प्रचार केला. काँग्रेस नेत्यांनी या प्रचारात झोकून दिले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीदेखील बऱ्याच कालावधीनंतर एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित केले. तर, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पायाला भिंगरी लावत अनेक ठिकाणी सभा घेतल्या. तर, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीदेखील सभा, रोड शो घेतले. प्रियंका गांधी यांनी केलेल्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. 

स्थानिक मुद्दे: निवडणुकीत काँग्रेसने आपला सगळ्या प्रचाराचा भर स्थानिक मुद्यांवर दिला होता. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण, राहुल गांधींची अपात्रता, ईडी-सीबीआयची कारवाई यापेक्षा काँग्रेसने आपल्या प्रचारात रोजगार, महागाई, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्यांवर अधिक भर दिला. अलिकडच्या वर्षांत प्रथमच कर्नाटकातच जात निहाय जनगणना करण्याचे आश्वासन काँग्रेसने देत केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्याचवेळी शेवटच्या क्षणी पीएफआय आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले. भाजप या मुद्द्यावरून आक्रमक झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांपासून ते स्थानिक नेत्यांनी या मुद्याचा  हनुमानाशी संबंध जोडून काँग्रेससमोर संकट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही राज्यात ठिकठिकाणी हनुमान मंदिरे बांधण्याचे आश्वासन दिले. 

भाजप नेत्यांना प्रवेश: काँग्रेसने भाजपमध्ये नाराज असलेल्या काही नेत्यांना प्रवेश दिला. यामध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, माजी उप-मुख्यमंत्री लक्ष्मण सावदी आदींचा समावेश होता. शेट्टर हे लिंगायत समुदायातील बनजिगा संप्रदायाशी संबंधित आहेत. तर, लक्ष्मण सावदी यांची तेली समाजावर पकड आहे. शेट्टर यांना पराभवाचा सामना करावा लागला. कधीकाळी भाजपशी संबंधित असलेले एच. डी. थमैय्या यांनाही काँग्रेसने निवडणुकीच्या मैदानात उतरवले. भाजपचे नेते, महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवी यांचे त्यांना आव्हान आहे. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीत सी.टी. रवी पिछाडीवर आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget