एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्नाटक निवडणूक निकाल 2018 : लिंगायतांनी काँग्रेसला नाकारलं!
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 : पण आतापर्यंत आलेले कल पाहता हे भाकित फोल ठरलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 : बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर करुन मोठी खेळी रचली होती. त्यामुळे भाजपचे समर्थक लिंगायत मतदार काँग्रेसकडे वळतील आणि काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती.
पण आतापर्यंत आलेले कल पाहता हे भाकित फोल ठरलं आहे. विशेषत: लिंगायतबहुल मतदारसंघात मोठं यश मिळवत भाजपला 37 जागांवर विजय मिळू शकतो. तर काँग्रेसला केवळ 18 आणि जेडीएस 8 जागांवर समाधान मानावं लागण्याची चिन्हं आहेत. तर दोन जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.
परंपरागत काँग्रेस समर्थक मुस्लीमबहुल परिसरातही भाजपने बाजी मारली आहे. मुस्लीमबहुल दहा जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस 8 आणि जेडीएसला 7 जागांवर आघाडी मिळाली आहे. कोणत्याही समाजाची 15 टक्क्यांहून जास्त लोकसंख्या असलेल्या परिसराला बहुल मानून हे आकडे तयार करण्यात आले आहेत.
2013 मध्ये येडियुरप्पा बाहेर पडल्याने भाजपला झटका
लिंगायतबहुल परिसरात यंदा भाजपच्या यशाचं श्रेय मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनाच जातं. 2013 चे आकडे पाहिले तर हे स्पष्ट होईल. 2013 मध्ये भाजपतून वेगळं होत त्यांनी निवडणूक लढवली. परिणामी लिंगायतबहुल परिसरात भाजपला केवळ पाच जागाच मिळवता आल्या होत्या. तर काँग्रेसला 47, जेडीएसला 11 आणि इतरांना 7 जागा मिळाल्या होत्या.
संबंधित बातम्या
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो : राज ठाकरे
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live: भाजपचं सेलिब्रेशन
राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री
कर्नाटक 'काँग्रेसमुक्त', देशातील 21 व्या राज्यातही कमळ फुललं
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 Live: बेळगावात काँग्रेसला आघाडी
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या अकरा हजार मतांनी पिछाडीवर
बेळगाव निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट : 18 जागांचे निकाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
निवडणूक
करमणूक
Advertisement