एक्स्प्लोर
‘त्या’ जैन दाम्पत्याविरोधात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
कोट्यवधीच्या संपत्तीसह तीन वर्षांच्या मुलीचा त्याग करुन संन्यास घेऊ इच्छिणाऱ्या जैन दाम्पत्याविरोधात मध्य प्रदेशातील मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नीमच : कोट्यवधीच्या संपत्तीसह तीन वर्षांच्या मुलीचा त्याग करुन संन्यास घेऊ इच्छिणाऱ्या जैन दाम्पत्याविरोधात मध्य प्रदेशातील मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने यासंदर्भात मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून, यात हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
नीमचमधील सुमीत राठोड (वय ३५) आणि अनामिका राठोड (वय ३४) या जैन दाम्पत्याने कोट्यवधीच्या संपत्तीसह आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा त्याग करुन संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे दाम्पत्य जैन मुनी आचार्य रामलाल यांच्याकडून संन्यास्थ मार्गाची दीक्षा घेणार आहेत.
दाम्पत्याच्या या निर्णयाविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या दाम्पत्याने संन्यास घेण्याचा हट्ट सोडावा, अशी अनेकांनी मागणी केली होती.
आता त्याविरोधात नीमचमधीलच इंदिरानगरचे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते कपिल शुक्ला यांनी मानवाधिकार आयोगाकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. शुक्ला यांनी यासाठी मानवाधिकार आयोगाला पत्र लिहून 23 सप्टेंबर रोजी गुजरातच्या सुरतमध्ये होणाऱ्या जैन भगवती दीक्षा सोहळ्यावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, राज्य मानवाधिकार आयोगाने कोणतीही टिप्पणी केली नाही. पण मानवाधिकार आयोगासह चाईल्ड केअर भोपाळ आणि नीमचचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनाही पत्राद्वारे याप्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
संबंधित बातम्या
3 वर्षांची मुलगी आणि 100 कोटींची संपत्ती सोडून दाम्पत्य संन्यास घेणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement