एक्स्प्लोर
'आप' मंत्र्याच्या प्रश्नाने मेहबुबा मुफ्ती भावनाविवश
!['आप' मंत्र्याच्या प्रश्नाने मेहबुबा मुफ्ती भावनाविवश Kapil Mishras Taunt Leaves Mehbooba Mufti In Tears 'आप' मंत्र्याच्या प्रश्नाने मेहबुबा मुफ्ती भावनाविवश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/04190454/Mehbuba-Mufti.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना एका जाहीर सभेत भावनाविवश झाल्या. वडिलांच्या आठवणीने मुफ्ती यांना अश्रू अनावर झाले.
केजरीवाल सरकारमधील मंत्री कपिल मिश्रा यांनी मुफ्तींना बुरहान वाणीबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नानंतर कार्यक्रमात गोंधळ उडाला. 'दहशतवाद आणि पर्यटन कधीच हातात हात घालून चालू शकत नाहीत, तुम्ही बुरहानला दहशतवादी मानता का?' असा सवाल मिश्रांनी केला होता.
यावेळी वडिलांच्या आठवणीने मुफ्तींच्या अश्रूचा बांध फुटला. 'आपल्या वडिलांनी पर्यटनाचा व्यवसाय म्हणून याकडे कधीच पाहिलं नाही. व्यवसायासोबतच एकीचे प्रयत्नही त्यांनी केले.' अशी आठवण मुफ्तींनी सांगितली. मेहबुबा मुफ्ती यांचे पिता मुफ्ती मोहम्मद सय्यद जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते.
कपिल मिश्रांना उत्तर देताना मुफ्ती यांनी चांगलंच सुनावलं. दिल्लीपेक्षा काश्मीरात महिला अधिक सुरक्षित असल्याचा दावा केला. काश्मीरच्या तुलनेत दिल्लीमध्ये बलात्काराच्या अधिक घटना घडत असल्याचं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)