Congress : मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाकरी फिरवली, कमलनाथ, भूपेश बघेल यांना निवडणुकीतील पराभव भोवला
Congress : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता काँग्रेसने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाकरी बदलली आहे.
Congress : काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पराभव झाल्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यात मोठे निर्णय घेतले आहेत. या दोन्ही राज्यात काँग्रेसने भाकरी फिरवली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) आणि मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ (Kamalnath) यांच्याकडे असलेली जबाबदारी कमी करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने कमलनाथ यांच्याऐवजी जीतू पटवारी (Jitu Patwari) यांना प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले आहे. तर, छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याऐवजी आता छत्तीसगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरण दास महंत (Charan Das Mahant) विरोधी पक्षनेते असणार आहेत.
काँग्रेस पक्षाने आज एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जीतू पटवारी यांना तात्काळ प्रभावाने मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मध्य प्रदेश काँग्रेसचे मावळते अध्यक्ष कमलनाथ यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge द्वारा श्री @jitupatwari को मध्य प्रदेश कांग्रेस कमेटी का प्रदेश अध्यक्ष, श्री @UmangSinghar को CLP लीडर और श्री @HemantKatareMP
— Congress (@INCIndia) December 16, 2023
को डिप्टी लीडर नियुक्त किया गया है।
आपको नई जिम्मेदारी की बधाई एवं भविष्य के लिए शुभकामनाएं। pic.twitter.com/sF2A3ScvcK
छत्तीसगडमध्ये कोणते बदल?
छत्तीसगडमध्ये पक्षाने प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांना कायम ठेवले आहे. छत्तीसगडमधील विरोधी पक्षनेते चरणदास महंत असणार आहेत. मागील विधानसभेत ते विधानसभा अध्यक्ष होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीपक बैज यांना पदावर कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली, असल्याची माहिती काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी दिली. नुकत्याच झालेल्या या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge द्वारा श्री @DrCharandas को छत्तीसगढ़ का CLP लीडर नियुक्त किया गया है।
— Congress (@INCIndia) December 16, 2023
आपको बधाई एवं भविष्य के लिए शुभकामनाएं। pic.twitter.com/UbQbhRx9F4
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने कमलनाथ यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, अनुकूल परिस्थिती असतानाही काँग्रेसला पराभव स्वीकारवा लागला. भाजपला 230 पैकी 163 जागांवर विजय मिळाला. तर, काँग्रेसला 66 जागांवर समाधान मानावे लागले. तर, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. त्यानंतर भूपेश बघेल यांच्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.