एक्स्प्लोर

Justice Yashwant Varma Case: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; अध्यक्ष ओम बिर्लांनी केली समिती गठीत, सदस्यांची नावेही जाहीर

Justice Yashwant Varma Case: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाभियोग प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

Justice Yashwant Varma Case: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या रोख रकमेच्या प्रकरणात अडचणी वाढताना दिसत आहेत. मंगळवारी (12 ऑगस्ट) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रस्तावावर एकूण 146 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते दोघेही सहभागी आहेत. लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक तपास समिती गठीत केली असून, या समितीत समाविष्ट असलेल्या न्यायाधीशांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गठीत केलेल्या चौकशी समितीत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील प्रत्येकी एक सदस्य तसेच एका कायदेतज्ज्ञाचा समावेश करण्यात आला आहे. चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत महाभियोग प्रस्ताव प्रलंबित राहणार आहे. या समितीत समाविष्ट करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार, कर्नाटक उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ बी. बी. आचार्य, आणि मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनिंद्र मोहन श्रीवास्तव यांचा समावेश आहे.

न्यायमूर्ती वर्मा यांना हटवण्याचा प्रयत्न का?

खरं तर, या वर्षी 14 मार्च रोजी न्यायमूर्ती वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी आग लागली होती. तेव्हा ते दिल्ली उच्च न्यायालयात होते. माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, परंतु त्यानंतर एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. न्यायमूर्ती वर्मा यांच्या स्टोअर रूममध्ये प्रत्येकी 500 रुपयांच्या जळालेल्या नोटांचे गठ्ठे सापडले, जे एका पोत्यात ठेवण्यात आले होते.

न्यायमूर्ती वर्मा यांची बदली

यावेळी न्यायाधीश वर्मा यांनी म्हटले होते की, त्यांच्या घरात किंवा दुकानात रोख रक्कम नव्हती. त्यांना एका कटाचा भाग म्हणून अडकवले जात आहे. यानंतर, 28 मार्च रोजी न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.

महाभियोग प्रस्ताव म्हणजे काय?

उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये महाभियोग प्रस्ताव आणता येतो. महाभियोग प्रस्ताव प्रथम राज्यसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे अध्यक्ष यांच्यासमोर सादर केला जातो. त्यानंतर प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाते. त्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक प्रतिष्ठित कायदेतज्ज्ञ यांचा समावेश असतो. 

आणखी वाचा 

मोठी बातमी : तब्बल 15 हजार पोलिसांची भरती, देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय!

महत्त्वाच्या बातम्या

Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!
सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!
Riya Talukdar Case: वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड
वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Embed widget