एक्स्प्लोर

कोलकाता हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती कर्नान यांना बेड्या

कोईम्बतूर : कोलकाता हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती सीएस कर्नान यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी तामिळनाडूच्या कोईम्बतूरमधून त्यांना बेड्या ठोकण्यात आला, त्यानंतर त्यांची रवानगी चेन्नईला करण्यात आली. कोईम्बतूरजवळ मदुकराईमधील एका अपार्टमेंटमध्ये कर्नान राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कोईम्बतूर पोलिसांच्या मदतीने पश्चिम बंगाल पोलिसांनी कर्नान यांना बेड्या ठोकल्या. कोर्टाच्या अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने कर्नान यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला होता. त्यानंतर म्हणजे 9 मे पासून ते परागंदा झाले होते.

कोर्टाच्या अवमान प्रकरणी सुनावणीला जस्टिस कर्नान यांची दांडी

कर्नान यांनी सरन्यायाधीशांसह त्यांच्या 6 सहकारी न्यायमूर्तींना थेट 5 वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने कर्नान यांचे निर्णय रद्द ठरवत, कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कर्नान यांनाच 6 महिन्यांची शिक्षा सुनावली. इतकंच नाही तर तातडीने त्यांची रवानगी जेलमध्ये करण्याचे आदेशही कोर्टाने दिले. कायदे क्षेत्रातील इतिहासात विद्यमान न्यायमूर्तीला तुरुंगवास ठोठावण्याची ही पहिलीच घटना आहे. कोण आहेत सी एस कर्नान? चिन्नास्वामी स्वामीनाथन कर्नान अर्थात सी एस कर्नान हे कोलकाता हायकोर्टाचे विद्यमान न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्ती कर्नान यांनी यापूर्वी दलित असल्यामुळेच भेदभावाचा बळी ठरत असल्याचा आरोप केला होता. त्याचाच आधार घेत कर्नान यांनी सरन्यायाधीशांसह 6 जणांना एससी/एसटी कायद्याअंतर्गत शिक्षा सुनावली होती. पण त्यांच्याजवळ असे आदेश देण्याचे न्यायालयीन अधिकार नाहीत. कारण त्यांना न्यायालयीन आणि प्रशासनिक काम करण्यापासून रोखण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात शड्डू ठोकल्यामुळेच ते नेहमीच चर्चेत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र न्यायमूर्ती कर्नान यांनी काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील न्यायमूर्ती भ्रष्ट असल्याचा आरोप करुन, खळबळ उडवून दिली होती. न्यायमूर्ती कर्नान यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत पंतप्रधानांना 20 न्यायमूर्तींची यादी दिली होती. वाद आणि कर्नान न्यायमूर्ती कर्नान हे नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. कर्नान हे मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती होते. तिथून त्यांची कोलकात्याला बदली झाली, त्यावेळी त्यांनी बदलीला विरोध केला होता. इतकंच नाही तर त्यांनी सरन्यायाधीशांनाच नोटीस धाडली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टालाच हस्तक्षेप करावा लागला. इतकंच नाही तर फेब्रुवारी 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती कर्नान यांनी दिलेल्या सर्व आदेशांवर स्थगिती दिली होती. मग राष्ट्रपतींच्या निर्देशानंतर न्यायमूर्ती कर्नान यांनी कोलकाता हायकोर्टाचा पदभार स्वीकारला होता. सहकारी न्यायमूर्तींवर आरोप कर्नान हे मद्रास हायकोर्टाचे न्यायमूर्ती होते त्यावेळी त्यांनी सर्वांना अचंबित करणारा आरोप केला होता. सहकारी न्यायमूर्तींवर त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. इतकंच नाही तर त्यांनी अनुसूचीत जाती आणि जनजातींच्या राष्ट्रीय आयोगात त्या न्यायमूर्तींची तक्रारही केली होती. भेदभावाचे आरोप न्यायमूर्ती कर्नान यांनी एका न्यायमूर्तींवर चप्पलेने शिवल्याचा आरोप केला होता. हा आरोप त्यांनी आपल्या चेंबरमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला होता. इतकंच नाही तर आपण दलित असल्यामुळे अन्य सहकारी जज आपल्याशी भेदभाव करतात, असाही आरोप त्यांनी केला होता. अचंबित करणारा निर्णय न्यायमूर्ती कर्नान यांनी एका सुनावणीदरम्यान सर्वांना अचंबित करणारा निर्णय दिला होता. दोन वयस्कर व्यक्तींमध्ये शारीरिक संबंध होत असतील, तर त्यांना पती-पत्नीच्या रुपात पाहा, असा तो निर्णय होता. वैद्यकीय चाचणीला विरोध सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती कर्नान यांच्या मानसिक संतुलनाबाबत त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी, समिती स्थापन्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायमूर्ती कर्नान यांनी तपासणी होऊ दिली नाही. सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती कर्नान यांनी 8 फेब्रुवारीनंतर दिलेल्या सर्व आदेशांना स्थगिती दिली होती. खंडपीठाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा, जे चेलमेश्वर, रंजन गोगोई, एम बी लोकूर, पी सी घोषण आणि कुरीयन जोसेफ यांचा समावेश होता. न्यायमूर्ती कर्नान हे सर्वोच्च न्यायालयात हजर झाले होते. मात्र त्यांनी त्यावेळी आपल्याविरोधातील निर्बंध हटवण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने त्याला नकार देत, पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले होते. काय होतं प्रकरण? न्यायमूर्ती कर्नान यांनी मद्रास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींविरोधात पत्र लिहून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने न्यायमूर्ती कर्नान यांच्याविरोधात अवमानाची नोटीस जारी केली होती. भारताच्या न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही विद्यमान न्यायधीशांना कोर्टात हजर राहावं लागलं होतं.  आता त्याच न्यायमूर्तींना शिक्षेलाही सामोरं जावं लागलं. संबंधित बातम्या  हायकोर्टाचे न्यायाधीश कर्नन यांना 6 महिन्यांची शिक्षा, सुप्रीम कोर्टाचा निकाल

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
CJP Delhi Protest Updates: ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
ट्रेन्स रद्द, मेट्रो बंद, इंटरनेट सस्पेंड अन् राजधानीच्या सीमांवर BSFचा वेढा; CJP आंदोलनापूर्वी राजधानी दिल्लीला चोहीकडून घेरा, आंदोलकांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Embed widget