एक्स्प्लोर
महिला पत्रकार, पोलीस निरीक्षक आणि लिव्ह-इन-रिलेशनशिपचं विकृत रुप!
नवी दिल्ली : पूजा तिवारी.... एक अशी शोध पत्रकार, जी आता या जगात नाहीय. पूजाची आत्महत्या की हत्या, हेही अद्याप उलगडलं नाही आणि याचदरम्यान पूजासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पोलीस निरीक्षक अमितची विकृती समोर आली आहे. पूजाला जिवंतपणी मरणयातना देणाऱ्या अमितचे कारनामे ऐकल्यावर मन सुन्न होऊन जातं.
पूजाची आत्महत्या की हत्या?....सध्यातरी हे एक रहस्यच बनून आहे. प्रेमातील धोका होता की शत्रूंचं कट? अखेर महिला पत्रकार पूजा तिवारीचा मारेकरी कोण आहे? अजूनही हे सत्य अंधारातच चाचपडत आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी तिचा लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनर पोलीस निरीक्षक अमित याला ताब्यात घेतलं आहे.
पूजाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप अमितवर आहे. अमितवरील या आरोपांचे पुरावे ‘एबीपी न्यूज’च्या हाती लागले आहेत. या पुराव्यांवरुन अमितच्या विकृतीचं दर्शन होतं. पूजाने जिवंतपणी अनुभवलेलं अत्यंत भयानक आयुष्य यातून समोर येतं.
अमित पूजाला मारत असे, अत्यंत अमूनषपणे मारत असे, पराकोटीचा संशय घेत असेल आणि अमितच्या याच संशयी स्वभावामुळे पूजाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पूजा आपलं दु:ख मैत्रिणीशी फोन चॅटिंगवरुन शेअर करत असे आणि हेच मेसेज अमितच्या विकृत स्वभावचे पुरावे ठरले आहेत.
पोलीस निरीक्षण अमित.... हरियाणा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक आणि पूजाचा लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनर. अमितवर जीवापाड प्रेम करणारी पूजा त्याच्यासोबत सुखाने आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहत होते. मात्र, याच नात्याने तिला असंख्य जखमा दिल्या, तिचा जीव घेतला.
अमित पूजावर संशय घेत असे, चोवीस तास पूजावर नजर ठेवून असे, लहान-सहान गोष्टींवरुन पूजाला अमानूषपणे मारहाण करत असे आणि या साऱ्या गोष्टींमुळे पूजाला प्रचंड त्रास सहन करावा लागत असे. म्हणूनच अमितसोबतचं नातं पूजा संपवू पाहत होती.
20 मे 2014 रोजी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी पूजा तिच्या मैत्रिणीशी चॅटिंग करत होती, तेव्हा चॅटिंगवेळी तिने मैत्रिणीशी आपलं सर्व दु:ख शेअर केलं. या सर्व चॅटिंगवरुन हे लक्षात येतं की, अमितने पूजाचं आयुष्य पुरतं उद्ध्वस्त केलं होतं.
पूजा – त्याने (अमित) माझ्या केसांना इतक्या जोराने खेचले आहेत, की अजूनही दुखतायेत. केसांना तेल लावत आहे. तेल लावत राहू ना काही दिवस?
पूजाची मैत्रीण – हो, प्लीज काही दिवस केसांना तेल लावत जा..
पूजा- केस खूप दुखतायेत
पूजाची मैत्रीण – हो गं, मी समजू शकते...
पूजा – हो
आपल्या मैत्रिणीशी चॅटिंग करताना पूजाने केवळ आपल्या लिव्ह इन पार्टन पोलीस निरीक्षक अमितच्या विकृतीचाच खुलासा केला नाही, तर या नात्यामुळे प्रचंड त्रास होत असल्याचेही सांगितले. शिवाय, मोठ्या तणावाखालून जात आहे.
पूजा- मला खूप राग आलाय..
पूजाची मैत्रीण- शांत राहा. तू माझ्यावर प्रेम करत असशील, तर तुला शांत राहावं लागेलययय
पूजा – मी खूप प्रयत्न केलं गं... मात्र राग कमी नाही होत... मी मोठ्या तणावाखालून जात आहे.
पूजाची मैत्रीण- माझ्याबाबतीतही तसंच आहे. मग मीही तसंच करु का?
पूजा – मी अमितपासून कंटाळले आहे. त्याचा त्रास होऊ लागलाय. त्याच्याशी असलेलं नातं, मला त्रास देऊ लागलं आहे.
अमितसोबतच्या नात्यामुळे पूजा प्रचंड दु:खी होती. ती नातं तोडण्याच्या विचारात होती. रोज नवनव्या जखमा देणाऱ्या या नात्यापासून ती दूर जाऊ पाहत होती. एका नव्या सुरुवातीसह नव्या आयुष्याची सुरुवात करु पाहत होती.
पूजा – मला अमितची सोबत नकोय. असं काहीतरी व्हायला हवं की, अमित आणि मी वेगळे होऊ. आता मला माझ्या आयुष्यात बदल हवाय. प्लीज उद्या भेट मला. मी खुप दु:खी आहे. मिस यी मोअर... लाईफमध्ये खूप अडचणी आहेत.
पूजाची मैत्रीण – हे शेवटचं नाही.
पूजा- मी माझं आयुष्य उद्ध्वस्त करुन घेतलंय. मला बरंही वाटत नाहीय.
पूजाची मैत्रीण – हो, आपण उद्या भेटू...
पूजा- मी खूप थकलीय, आता माझी हिंमत नाही..
पूजाची मैत्रीण – टेन्शन नको घेऊस, आपण भेटू. सर्व नीट होईल.
पूजा आणि तिची मैत्रीण, यांच्यामधील चॅटिंग खूप काही सांगून जाते. पूजा आपल्या लिव्ह इन पार्टनर पोलीस निरीक्षक अमितच्या स्वभावामुळे, मारहाणीमुळे प्रचंड कंटाळलेली होती. ती त्याच्याशी असलेलं नातं तोडू पाहत होती.
30 जानेवारी 2016 रोजीच्या फेसबुकवरील आपल्या मैत्रिणीसोबतच्या चॅटिंगदरम्यान पूजा प्रचंड टेन्शनमध्ये होती. अमित मर्यादेपलिकडे तिच्यावर संशय घेत होता.
पूजा – इथे मेसेज नको करुस. काल रात्री फेसबुक मेसेंजर इन्स्टॉल केलं आहे, त्यानंतर अमितच्या भीतीने मी अनइन्स्टॉल केलं आहे. तो माझा फोन चेक करतो.
पूजाची मैत्रीण – अरेरे, तुला तुझं आयुष्य आहे की नाही?
पूजा – व्हॉट्सअपच कर...
पूजाची मैत्रीण – आणि तू इतकी घाबरलेली का आहेस?
पूजा – सोड यार...
पूजाच्या या मैत्रिणीचं नाव आहे मॅडी... मॅडीने पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर अनेक खुलासे केले, ज्यामुळे थरकाप उडतो. मॅडी पूजाच्या इथे काही दिवस राहायला आली होती, त्यावेळी तिच्या डोळ्यासमोर पूजाला अमितने मारहाण केली होती.
एक मेच्या रात्री पूजा तिवारी जेव्हा पाचव्या मजल्यावरुन खाली पडली, तेव्हा तिच्या फ्लॅटमध्ये दोनच व्यक्ती उपस्थित होत्या. पूजाची मैत्रीण अमरीन आणि पोलीस निरीक्षक अमित वशिष्ठ (पूजाचा लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनर).
पूजाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिची मैत्रीण अमरीनचा जबाब नोंदवला. मात्र, पोलीस निरीक्षक असलेला पूजाच्या पतीचा म्हणजेच अमित वशिष्ठ गप्प होता. अमित त्यावेळी दारुच्या नशेत होता, असाही आरोप केला जात आहे. मात्र, फरीदाबाद पोलिसांनी त्याचा जबाबही घेतला नाही आणि मेडिकलही केलं नाही. एवढंच नव्हे, तर पूजाच्या मृत्यूनंतर अमित तिथे थांबण्याऐवजी फरीदाबादहून पंचकुलाला निघून गेला.
विशेष म्हणजे पूजाचे कुटुंबीयही अमितच्या बाजूने बोलत होते आणि पूजा अमितला भाऊ मानत असल्याचेही सांगत होते. मात्र पूजाच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या कुटुंबीयांनाही अमितवर संशय येऊ लागला. अमितने स्वत:च्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स ठेवल्याचीही माहितीही कुटुंबीयांनी दिली. बाऊन्सर्स पूजाच्या कुटुंबीयांचा व्हिडीओ तयार करुन, अमितकडे सर्व माहिती पोहोचवत असत.
3 मेच्या रात्री म्हणजेच पूजाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशीच अमित पूजाच्या फ्लॅटमधील कपाटाचा तपास करत होता. त्यानंतर अमित एक बॅग पंचकुलाला घेऊन गेला. खरंतर पूजाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी फ्लॅट सील करण्याची गरज होती.
पंचकुलाला पोहोचल्यावर अमितने असा खुलासा केला की, बॅगमध्ये सुसाईड नोट मिळाली आहे. मात्र, या सुसाईड नोटमध्ये अमितला निर्दोष असल्याचं पूजाने लिहिलं आहे. मात्र, या सुसाईड नोटवरच शंका उपस्थित केली जाते आहे.
सुसाईड नोट पाहिल्यावर वाटतं की, अमितला दोषी ठरवलं नाही. मात्र, पूजाच्या कुटुंबीयांनी सुसाईड नोट नकली असल्याचं म्हटलं आहे. सुसाईड नोट लिहिण्यासाठी दोन पेनचा वापर केला गेलाय. आधी सुसाईड नोट निळ्या रंगाच्या शाईने आणि नंतर काळ्या रंगाच्या शाईने लिहिलीय. त्यामुळे पूजाच्या मृत्यूनंतर अमितने पोलिसांना फसवण्यासाठी तर सुसाईड नोट लिहिली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
जे लोक पूजाला वैयक्तिकरित्या ओळखतात, ते सर्व सांगतात की, अमित पूजाला धोका देत होता. त्याने विवाहित असतानाही त्याने ही गोष्ट पूजापासून लपवून ठेवली होती आणि ज्यावेळी पूजाला हे कळलं, तेव्हापासून दोघांमध्ये भांडणं सुरु झाली. दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ लागला आणि मग पूजाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
पूजाचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असून, पूजाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपीखाली पोलिसांनी अमितला ताब्यात घेतलं आहे. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर अमितला फरिदाबाद पोलिसांनी बुधवारी सीजीएम कोर्टात सादर केलं. कोर्टाने अमितची 24 मे पर्यंत तुरुंगात रवानगी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement