एक्स्प्लोर

Jodhpur Communal Clash : जोधपूरमध्ये कसा भडकला हिंसाचार?, कधीपासून सुरू झाला वाद? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम 

Jodhpur Communal Clash : सोमवारी रात्री उशिरा राजस्थानमधील जोधपूर शहरात धार्मिक तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या दगफेकीत पाच पोलीस जखमी झाले.

Jodhpur Communal Clash : देशभर आज ईदचा सण साजरा केला जात आहे. परंतु, ईदच्या काही वेळ आधी म्हणजे सोमवारी रात्री उशिरा राजस्थानमधील जोधपूर शहरात धार्मिक तणाव निर्माण झाला होता. यावेळी झालेल्या दगफेकीत पाच पोलीस जखमी झाले होते. काही काळानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु, मंगळवारी सकाळी नमाज पठण झाल्यानंतर पुन्हा तेथे काही लोकांनी दगडफेक केली. त्यामुळे या भागात पुन्हा तणाव वाढला आहे.  या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. 

सोमवारी मध्यरात्री दोन गटात तणाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील हा वाद सोमवारी मध्यरात्रीनंतर सुरू झाला. अल्पसंख्यांक समाजातील काही नागरिकांनी जोधपूरमधील जालोरी गेट जवळ धार्मिक झेंडे फडकवले. चौकात बसवलेल्या स्वातंत्र्यसैनिक बालमुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर या नागरिकांनी झेंडा लावला. त्याला हिंदू समाजातील काही लोकांनी विरोध केला. याबरोबरच परशुराम जयंतीनिम लावलेल्या भगव्या ध्वजावरून दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले. त्यानंतर याच तणावातून दोन्ही गटात मारामारी झाली. 

मंगळवारी पुन्हा दगडफेक
दोन्ही गटातील तणावानंतर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. परंतु, यावेळी जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात पाच पोलीस जखमी झाले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नाळकांडी फोडली. शिवाय अफवा रोखण्यासाठी मंगळवारी इंटनेट सेवा बंद ठेवली होती. मंगळवारी जोधपूर मधील जालोरी गेटजवळ ईदनिमित्त नमाज पठण करण्यात आले. नमाज पठण करण्यात आल्यानंतर काही समाज कंठकांनी याठिकाणी दगडफेक केली. त्यामुळे सोमवारी नियंत्रणात आलेली परिस्थिती पुन्हा चिघळली. या दगडफेकीत परिसरातील काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. 

जोधपूरमधील अनेक भागात संचारबंदी 
जोधपूरमधील या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि तणाव  निर्माण झालेल्या परिसरात संचारबंदी लागू करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर परिसरातील काही भागांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यासह दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लावण्यात आली आहे. 

मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन 
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या तणापूर्ण परिस्थितीत नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. जोधपूरमधील घटना दुर्देवी असून लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांती राखावी. सर्वच समाजातील नागरिकांनी यासाठी प्रयत्न करावेत आणि कायद्याचे पालन करावे.  

महत्वाच्या बातम्या

Jodhpur : राजस्थानच्या जोधपूरमध्ये झेंडा लावण्यावरुन दोन गटात वाद, दोन्ही गटाकडून दगडफेक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलंCM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget