(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतात 'व्हाईट कॉलर' नोकऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ, कोणत्या क्षेत्रात मिळताहेत सर्वाधिक नोकऱ्या? इंडीड सर्वेक्षणाचा निष्कर्ष
कोणत्या क्षेत्रात अधिक नोकऱ्या मिळत आहेत? कोणत्या क्षेत्रात इथून पुढे नोकऱ्यांना संधी असेल? जाणून घ्या...
white coller jobs: भारतातील व्हाईट कॉलर नोकऱ्यांमध्ये एप्रिल ते जून महिन्यांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे, असं इनडिड हायरिंग ट्रॅकरच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्वेक्षणानुसार, इथून पुढे नोकऱ्या मिळतील , पण पुढील दोन वर्षात जर अप्सकिलिंगकडे लक्ष दिले नाही तर 61% कंपन्यांना कौशल्य संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल असं यात म्हटलंय. विक्री आणि विपणन भूमिका नियोक्त्यांसाठी लक्ष केंद्रीत करण्याचे महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून उदयास आले आहेत, ज्याचा वाटा अनुक्रमे 30% आणि 23% आहे. Valuvox ने केलेल्या सर्वेक्षणातून हा डेटा आला आहे ज्यामध्ये 3,680 नियोक्ते, कर्मचारी आणि नोकरी शोधणाऱ्यांचा समावेश आहे.
देशात सध्या शिक्षण, नोकऱ्या आणि बेरोजगारी या तिघांची सांगड घातल्यास नकारात्मक चित्र दिसत असताना एप्रिल ते जूनमध्ये पांढरपेशांच्या नोकऱ्यांचा ट्रेंड सकारात्मक दिसल्याचं या अहवालावरून स्पष्ट होतंय.
कोणत्या क्षेत्रात अधिक नोकऱ्या मिळत आहेत?
सध्या कोणताही तरुण अधिक चांगला आयुष्य जगण्यासाठी चांगल्या नोकऱ्यांच्या शोधात आहे. शिक्षण असूनही नोकऱ्या न मिळण्याचे प्रमाण अधिक असून सुशिक्षित बेरोजगारीची समस्या साऱ्या देशात आहे. दरम्यान या अहवालानुसार, आयटी, सेल्स, डेटा इंजीनियरिंग, डेटा सायंटिस्ट अशा पदांसाठी मोठी मागणी राहिली. एप्रिल ते जून मध्ये 73% भरती करण्यात आली असून मागील ती माहीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी व्हाईट कॉलर नोकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे.
नोकऱ्या मिळतील पण...
या सर्वेक्षणाच्या प्रमुख निरीक्षणानुसार, जरी या कंपन्या नोकऱ्यांची भरती करत असल्या तरी कौशल्याची कमतरता आहे त्यांच्यासमोर ते मोठे आव्हान आहे. जर अप्सकलिंग कडे लक्ष दिले नाही तर पुढील दोन वर्षात 61% कंपन्यांना कौशल्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
आयटी, सेल्सच्या पदांसाठी मोठी मागणी
या सर्वेक्षणानुसार आयटी क्षेत्रातील बहुतांश पदांसाठी सध्या प्रचंड मागणी वाढली असून विक्री आणि विपणनावरील वाढता भर लक्षात घेता नोकरी शोधणाऱ्यांसाठी तांत्रिक आणि संवाद कौशल्यांमध्ये अप्सकलिंग करणं गरजेचं असल्याचं या अहवालात म्हटलं.
कोणत्या क्षेत्रात असतील नोकऱ्या?
इंडीड फायरिंग ट्रॅकर न ठळकपणे सांगितलं भविष्यातील कौशल्य मागणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख क्षेत्रांमध्ये क्लाऊड कम्प्युटिंग(२७%), शाश्वत विकास (२३% ) आणि ए आय सारख्या नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाकडे 20% कल राहणार आहे.