एक्स्प्लोर

हेमंत सोरेन झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री; काँग्रेस दोन तर आरजेडीच्या एका नेत्याचाही शपथविधी

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या दोन तर आरजेडीच्या एका नेत्याने शपथ घेतली.

नवी दिल्ली : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी मोरहाबादी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात सोरेन यांनी झारखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हेमंत सोरेन यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आलमगीर आलम, रामेश्वर उरांव आणि राष्ट्रीय जनता दलाकडून यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी या नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या झारखंडच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करत काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे भाजपच्या हातून महाराष्ट्र पाठोपाठ झारखंडही निसटलेलं आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज सायंकाळी कॅबिनेटची पहली बैठक बोलावली आहे. शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती - हेमंत सोरेन यांच्या शपथविधीवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव डी राजा, अतुल अंजान आणि डीएमके नेता एम के स्टालिन उपस्थित होते. दरम्यान, यात माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सहभागी होऊ शकले नाही. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती देखील गैरहजर होते. व्यस्त कार्यक्रमांमुळे पंतप्रधान मोदी अनुपस्थित : जेएमएम झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रवक्ता आणि महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले की, हेमंत सोरेन यांनी शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रण दिलं आहे. परंतु, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी हेमंतर सोरेन यांना शुभेच्छआ दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान म्हणाले की, वेळ मिळताच ते झारखंडमध्ये येणार आहे. असा होता झारखंड निवडणुकांचा निकाल झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीला 46 जागा मिळाल्या असून भाजपला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेस आघाडीत झारखंड मुक्ती मोर्चाला 28 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आहेत. झारखंडमध्ये 81 जागांवर मतदान झालं होतं. प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. बहुमतासाठी लागणारा 41 आकडा असून काँग्रेस आघाडीनं 46 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. हेही वाचा - बालकांचा मृत्यू होणं यात काहीही नवीन नाही, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं असंवेदनशील वक्तव्य Jharkhand Assembly Election | झारखंड विधानसभा, भाजपचं पानिपत, स्थानिक मुद्द्यांचा भाजपला का विसर पडतो? | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेगABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget