एक्स्प्लोर

मराठमोळे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांची दरियादिली, मातीचे दिवे विकणाऱ्या चिमुकल्यांना भन्नाट दिवाळीभेट

झारखंडमधील कोडरमा जिल्ह्याचे मराठमोळे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी मातीचे दिवे विकणाऱ्या या चिमुकल्यांना खास दिवाळी गिफ्ट दिलं.

मुंबई : वर्षभर मातीचे दिवे बनवणारे कुंभार बांधव दिवाळी गोड होईल या आशेने राबत असतात. मात्र सध्या प्लास्टिक आणि चायनिज दिव्यांमुळे या कारागिरांची दिवाळी अंधारात जाते. मात्र एका मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्याने संवेदनशीलतेचा परिचय दाखवत अशा कारागिरांची दिवाळी गोड केली आहे. रमेश घोलप असं या जिल्हाधिकाऱ्यांचं नाव. ते सध्या झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.

नेमकं काय घडलं? रमेश घोलप यांनी कुंभार बांधवांकडून तब्बल एक लाख रुपयांचे मातीचे दिवे विकत घेत त्यांना अनोखी दिवाळीभेट दिली आहे. त्याचं झालं असं सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एक चिमुकली म्हणत आहे की, "चाचा बोले है, जब हमारे मिट्टी के दिये बिक जायेंगे, तब तुम्हे बहुत सारा पटाखा मिलेगा." असं निरागसपणे बोलणार्‍या चिमुकलीचा व्हिडीओ जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी पाहिला आणि ते थेट आपल्या अधिकाऱ्यांसह थेट कुंभार कारागिरांच्या घरी पोहोचले आणि एक लाख रुपयांचे मातीचे दिवे तेथील कारागिरांकडून खरेदी केले.

यापेक्षा दुसरं मोठं सेलिब्रेशन नाही : रमेश घोलप एबीपी माझा डिजिटलशी बोलताना जिल्हाधिकारी घोलप म्हणाले की, "आपण आपल्या कृतीने ज्या लोकांच्या जीवनात अंधार आहे अशा लोकांच्या जीवनातील अंधार दूर करु शकतो, यापेक्षा दुसरं मोठं सेलिब्रेशन नाही. जिल्ह्यातील अन्य अधिकाऱ्यांसह मिळून आम्ही एक लाख रुपयांचे दिवे विकत घेतले. हा छोटासा प्रयत्न आहे. प्लास्टिक दिवे घेण्यापेक्षा या कारागिरांकडून दिवे घ्यावेत. त्यामुळे त्यांच्या कलेचा सन्मान होईल, सोबत पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते चांगलं आहे."

विकून परिस्थितीवर मात करुन झाले जिल्हाधिकारी धरणात प्रकल्पबाधित होऊन विस्थापित झालेलं छोटसं सोलापूर जिल्हातील बार्शीतलं महागाव हे रमेश गोरख घोलप यांचं गाव. वडील गेल्यानंतर त्यांच्या आईने बांगड्या विकून, मजुरी करून त्यांना आणि त्यांना भावाला शिकवलं. आईसोबत रमेश घोलप यांनीही बांगड्या विकल्या आहेत. डीएड करुन जिल्हा परिषद शिक्षक झालेले रमेश घोलप यांनी नोकरीचा राजीनामा देत स्पर्धा परीक्षा दिल्या आणि उत्तुंग यश मिळवलं. एकाच वेळी एमपीएससीत राज्यात पहिले तर यूपीएससीत देखील ते यशस्वी झाले.

कडक शिस्तीचा अधिकारी अन् संवेदनशील माणूस UPSC पास झाल्यानंतर त्यांना झारखंड कॅडर मिळालं. त्यांनी पोस्टिंग मिळाली तिथं अवैध धंदे, बोगसगिरीवर आळा घालत कारवाईचा धडाकाच लावला. 'गॅंग्स ऑफ वासेपूर' फेम धनबादमध्ये आयुक्त असताना त्यांनी अवघ्या 66 दिवसाच्या कार्यकाळात अतिक्रमण, स्वच्छतासारख्या अनेक सामाजिक मुद्द्यावर प्रत्यक्ष कार्यवाही सुरु केली. शाळांची व्यवस्था पाहायला गेल्यावर शाळेत शिकवणारा शिक्षक अधिकारी, स्वच्छता अभियान राबवताना पहिल्यांदा स्वताच्या हाती झाडू घेणारा अधिकारी, अवैध धंद्यांवर कारवाईत पुढे जाऊन धाड टाकणारा अधिकारी अशा अनेक रुपात लोकांनी त्यांना पाहिलं. या धडाक्यामुळे त्यांच्या बदल्याही झाल्या. त्यांच्या बदल्यानंतर आम्हाला हाच अधिकारी हवा म्हणून लोकं रस्त्यावर उतरली.

तरुणाईला 'उमेद' देणारा अधिकारी आता रमेश घोलप कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्याआधी ते झारखंड राज्याचे कृषी आयुक्त होते. कृषी आयुक्त असतानाही त्यांनी शेतकरी वर्गासाठी अनेक महत्त्वाची कामं केली. ही सगळी काम करत असताना ते सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. तिथे ते तरुणाईला नेहमी मार्गदर्शन करतात. उमेद या संस्थेच्या माध्यमातून आपल्या मातीशी नाळ त्यांनी कायम ठेवली आहे. युवकांसाठी स्पर्धा परीक्षा संमेलनं तसेच वेगवेगळे उपक्रम ते सुट्टीत बार्शीला आल्यावर राबवत असतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget