एक्स्प्लोर

जेडीयूचे नेते शरद यादव आणि अली अनवर यांची राज्यसभेतील खासदारकी रद्द

जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद याव आणि अली अनवर यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. शरद यादव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी होता. तर अली अनवर यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ बाकी होता. पण पक्षाच्या तक्रारीनंतर राज्यसभा सचिवालयाने त्यांचं सदस्यत्व रद्द केलं.

पाटणा : जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद याव आणि अली अनवर यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. दोघांवरही जेडीयूने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राज्यसभा सचिवालयाकडे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीवरुन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी दोन्ही नेत्यांचं सदस्यत्व रद्द केलं. वास्तविक, शरद यादव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी होता. तर अली अनवर यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ बाकी होता. पण पक्षाच्या तक्रारीनंतर राज्यसभा सचिवालयाने त्यांचं सदस्यत्व रद्द केलं. गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि शरद यादव यांच्यात अंतर्गत कलह शिगेला पोहचला होता. नितीश कुमारांनी बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबतचं महागठबंधनचं सरकार बरखास्त करत, भाजपशी हातमिळवणी करुन पुन: सत्ता स्थापन केली. याला शरद यादव यांनी तीव्र विरोध केला होता. त्यानंतर जेडीयूने मनाई करुनही शरद यादवांनी पाटणामधील लालूप्रसाद यादवांच्या ‘भाजप भगाव, देश बचाओ’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात व्यासपीठावरुन नितीश सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं गेलं होतं. शरद यादव यांनी पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळावं, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण निवडणूक आयोगाने शरद यादव यांची ही मागणी फेटाळली होती. पण यानंतर नितीश कुमार आणि शरद यादव यांच्यातील उभी फूट स्पष्ट झाली होती. शरद यादव यांचं राज्यसभेतील सदस्यत्व रद्द झाल्यानंतर, पक्षाचे नेते के.सी. त्यागी यांनी सांगितलं की, “लालू प्रसाद यादवांच्या मोर्चात सहभागी होऊन, शरद यादवांनी पक्षाच्या धोरणांना हरताळ फासला होता. त्यांची ही भूमिका पक्षाच्या नियमांचे उल्लंघन असल्याने, त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.” दरम्यान,शरद यादव यांची राज्यसभेतील सदस्यत्व रद्द झाल्याने, त्यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget