एक्स्प्लोर

जसप्रीत बुमराच्या आजोबांवर रिक्षा-टेम्पो चालवण्याची वेळ!

देहराडून : भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्याही खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या खेळानंतर लक्ष्य जातं ते त्याच्या स्टारडमवर. भारतीय क्रिकेट संघाचं तिकीट मिळाल्यानंतर सामान्यातला सामान्य खेळाडूही स्टार बनतो. पण एवढ्या मोठ्या स्टार क्रिकेटरच्या घरातील सर्वात खास सदस्य हालाखीत जगत आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवाल का? नाही ना. पण असंच काहीसं टीम इंडियाचा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट गोलंदाज जसप्रीत बुमराच्या आजोबांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर जसप्रीत बुमरा चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान चर्चेत राहतो. त्याने टी-20 च्या आयसीसी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, मात्र त्याचे आजोबा हालाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. उत्तराखंडच्या उधमसिंहनगरमध्ये राहणारे जसप्रीत सिंह बुमराचे आजोबा रिक्षा-टेम्पो चालवून पोट भरत आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या जसप्रीत बुमराच्या आजोबांना नातवाची कामगिरी मैदानावर पाहता येत नसल्याची खंत आहे. एका सामान्य क्रिकेट चाहत्याप्रमाणे त्यांनीही नातवाला केवळ टीव्हीवरच खेळताना पाहिलं आहे. उधमसिंहनगरच्या किच्छामध्ये राहणारे जसप्रीत बुमराचे आजोबा संतोष सिंह यांच्यासोबत नशिबाने असा खेळ खेळला की, त्यांच्यावर रिक्षा-टेम्पो चालवण्याची नामुष्की ओढावली आहे. कुटुंबाची फरफट 84 वर्षीय संतोष सिंह बुमरा किच्छामध्ये आपल्या एका दिव्यांग मुलासह भाड्याच्या घरात राहतात. पण बुमराच्या आजोबांवर ही परिस्थिती का ओढावली, यासाठी आपल्याला 15 वर्ष मागे जावं लागेल. हे कुटुंब अगदी आलिशान आयुष्य जगत होतं. संतोष सिंह बुमरा यांचा मुलगा आणि जसप्रीत बुमराचे वडील जसवीर बुमरा यांचे गुजरातमधील अहमदाबादमध्ये तीन कारखाने होते. पण 2001 मध्ये जसप्रीत बुमराच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर कुटुंबाची फरफट सुरु झाली. Bumrah_Grandfather_1 मुलाच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब आर्थिक संकटात सापडलं. बँकांचं कर्ज फेडण्यासाठी तिन्ही कारखाने विकावे लागले. त्यानंतर बुमरा कुटुंब उत्तराखंडमध्ये गेलं. यादरम्यान काही कारणांमुळे जसप्रीत बुमराची आई आणि जसप्रीत आजोबांपासून वेगळे राहू लागले. पोलिसांनी टेम्पो पकडल्यानंतर रहस्याचा उलगडा संतोख सिंह बुमरा यांच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असलेला टेम्पोची पावती नुकतीच पोलिसांनी फाडली होती. तो सोडवून आणण्यासाठी त्यांनी अनेक दिवस सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारल्या. यावेळी काही त्यांच्या काही परिचितांनी त्यांच्याबाबत माहिती दिली. इतकंच नाही तर संतोख यांनी जसप्रीत बुमराचे आजोबा असल्याचे अनेक पुरावेही मीडियासमोर सादर केले. बुमराकडून मदतीची अपेक्षा नाही आपल्या नातवाला छातीशी कवटाळण्याची जसप्रीतच्या आजोबांची इच्छा आहे की. यासाठी ते जसप्रीत बुमराच्या येण्याची वाट पाहत आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचलेला नातू कधी ना कधी विचारपूर करेलच, अशी अपेक्षा बुमराच्या आजोबांनी व्यक्त केली. क्रिकेटर जसप्रीत बुमराच्या आजोबांनी स्पष्ट सांगितलं की, त्यांना नातवाकडून एका पैशाच्या मदतीची अपेक्षा नाही. माझा नातू आज मोठा खेळाडू आहे, याचा मला अभिमान आहे. त्याला फक्त एकदा मिठी मारुन आशीर्वाद द्यायचा आहे, अशी त्यांची इच्छा आहे. बुमरा, आताच्या घडीला भारतीय क्रिकेटचा चमकता तारा आहे. त्याने 16 वन डे सामन्यांमध्ये 26 विकेट्स घेतल्या  होत्या. तर टी-20 मध्ये बुमराने एकूण 33 विकेट्स आपल्या नावावर जमा केल्या आहेत. आयपीएलमध्ये बुमरा मुंबई इंडियन्स टीमचा स्टार पेसर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget