Jammu Kashmir Terrorist Attack : अनंतनागमध्ये चेकपोस्टवर पुन्हा दहशतवादी हल्ला, एक पोलिस कर्मचारी जखमी
Terrorist Attack : अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफचे चेकपोस्टजवळ हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे
![Jammu Kashmir Terrorist Attack : अनंतनागमध्ये चेकपोस्टवर पुन्हा दहशतवादी हल्ला, एक पोलिस कर्मचारी जखमी Jammu Kashmir Terrorist Attack Another terrorist attack on check post in Anantnag one policeman injured Jammu Kashmir Terrorist Attack : अनंतनागमध्ये चेकपोस्टवर पुन्हा दहशतवादी हल्ला, एक पोलिस कर्मचारी जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/12/558eb9f36a0d7f545752caf00b112c9b166030099317889_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफचे जवान एका चेकपोस्टजवळ तपासणी करत होते. त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला.
हल्ल्यानंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आणि त्यानंतर सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे.
या अगोदर देखील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारच्या एक मजुरावर गोळीबार केला. काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, मध्यरात्री दहशतवाद्यांनी बांदीपोराच्या सोदनारा संबल या भागात बिहारच्या मोहम्मद अमरेज आणि मुलगा मोहम्मद जलील यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान मोहम्मद अमरेज यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
24 तासांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा
सैन्य दलाने मागील 24 तासांत जम्मू काश्मीरमधील बडगाम आणि राजौरी या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बडगाम येथे तीन आणि राजौरी येथे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे.
बडगाममध्ये झालेल्या चकमकीत टीआरएफ दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये लतीफ राथर हा दहशतवादीही मारला गेला. लतीफ राथर दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. टार्गेट किलिंगमध्ये त्याचा हात होता. याशिवाय सैन्य दलाच्या जवानांच्या हत्येमागेही तोच सूत्रधार होता.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याचा मोठा कट
ब्रिगेडियर व्हीजेएस बिर्डी (Brigadier VJS Birdi) यांनी सांगितलं की, लतीफ हा साकिब अहमद खानसोबत दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. यांनी समीर अहमद, राहुल भट आणि अमरीन भट, खोनमोहचे सरपंच आणि चदूरा येथील वीटभट्टीवर स्थानिक नसलेल्यांची हत्या केली. ते स्वातंत्र्य दिनापूर्वी मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. 10 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जवान आणि पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि तिघांना ठार केलं. या कारवाईत सुरक्षा दलाची कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)