जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत पोलीस उपअधीक्षकाला अटक
कुलगाम परिसरातील नीरबाजार परिसरात रुटिन चेकिंग दरम्यान पोलिसांनी एकाच गाडीत बसलेल्या दोन दहशतवादी, ड्रायव्हर आणि पोलीस उपअधीक्षकाला अटक केली आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत फिरत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये एका गाडीतून उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांसोबत फिरत होता. देवेंद्र सिंह असं पोलीस उपअधीक्षकाचं नाव आहे. डीएसपी के साथ नवीद अहमद उर्फ बाबू, राफी अहमद राथर उर्फ आरिफ और इरफान अहमद मीर
कुलगाम परिसरात रुटिन चेकिंग दरम्यान पोलिसांनी एकाच गाडीत बसलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सय्यद नबीद बाबूसह राफी अहमद राथर उर्फ आरिफ आणि इरफान अहमद मीर या दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली. चौघांच्या चौकशीनंतर त्यामध्ये एक पोलीस उपअधीक्षक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पोलीस अधीक्षकाच्या घराची झडती घेतली त्यावेळी त्याच्या घरातून काही हत्यारं आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या घरी छापेमारीत 5 ग्रेनेड आणि 3 एके-47 सापडली आहे.
या पोलीस अधीक्षक देवेंद्र सिंहची ड्युटी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. मात्र देवेंद्र सिंह दहशतवाद्यांसोबत एकाच गाडीत काय करत होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस विभागाकडून या संपूर्ण प्रकारावर कोणतंही स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही. मात्र हा पोलीस अधिकारी सिक्रेट ऑपरेशनवर होता की आणखी काही कारण आहे, हे पोलिसांच्या अधिकृत माहितीनंतर स्पष्ट होईल.
कोण आहे सय्यद नबीद बाबू?
अटक केलेला दहशतवादी सय्यद नबीद बाबू दक्षिण काश्मीरमधील एक कमांडर आहे. त्याच्यावर अनेक स्थानिक लोकांच्या हत्येचा आणि हल्ल्याचा आरोप आहे. नबीद आधी पोलीस दलात होता. दोन वर्षांपूर्वी तो एफसीआयच्या गोदामात तैनात होता. यावेळी त्याने काही शस्त्रास्त्र चोरली आणि दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते.
National News | देशभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha