Jammu Kashmir : स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद
Jammu Kashmir : लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत भारतीय लष्कराचे 3 जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
J&K | In a terrorist attack 25 kms from Rajouri, two terrorists carried out a suicide attack on an Army company operating base. Both terrorists killed while 3 soldiers lost their lives. Operations in progress.
— ANI (@ANI) August 11, 2022
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/Qt7TsAawki
भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी
जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, "राजौरीतील परगल, दारहाल भागातील लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा कोणीतरी प्रयत्न केला, त्यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दारहाळ पोलिस ठाण्यापासून सहा किलोमीटर अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. यात दोन दहशतवादी ठार झाले असून लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत.
राजौरी के दारहाल इलाके के परगल में सेना के कैंप फेंस को किसी ने पार करने की कोशिश की। इस दौरान दोनों तरफ से गोलियां चलीं। दारहल थाने से 6 किमी दूर तक अतिरिक्त दल भेजे गए। 2 आतंकवादी मारे गए और सेना के 2 जवान घायल हुए हैं: मुकेश सिंह, ADGP, जम्मू, जम्मू-कश्मीर
— ANI_HindiNews (@AHindinews) August 11, 2022
दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना हाणून पाडले
स्वातंत्र्य दिनापूर्वी देशाला हादरवण्यासाठी दहशतवादी संघटना सतत एखादी मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत आणि भारतीय सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या नापाक मनसुब्यांना ठामपणे हाणून पाडत आहेत. राजौरी येथील लष्कराच्या छावणीत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उरी हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. त्याच धर्तीवर 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळील भारतीय लष्कराच्या छावणीत घुसून दहशतवाद्यांनी झोपलेल्या भारतीय जवानांवर हल्ला केला होता. झोपलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात लष्कराचे 16 जवान शहीद झाले. त्याचवेळी लष्कराच्या कारवाईत चार दहशतवादी मारले गेले. 20 वर्षांतील भारतीय लष्करावरील हा सर्वात मोठा हल्ला होता.