Whatsapp Delivery : गरोदर महिलेने 3 इडियट्स चित्रपटाप्रमाणे व्हिडीओ कॉलच्या मदतीने बाळाला जन्म दिला!
Whatsapp Delivery : जम्मू-काश्मीरच्या बर्फाच्छादित केरनच्या दुर्गम भागात डॉक्टरांनी एका गर्भवती महिलेला 'व्हॉट्सअॅप कॉल'वर प्रसूती होण्यास मदत केली.
Woman Delivery On WhatsApp Call : तुम्हाला आमिर खानचा (Amir Khan) प्रसिद्ध चित्रपट थ्री इडियट्स (3Idiots) आठवत असेल. या चित्रपटात व्हिडीओ कॉलच्या मदतीने बाळाला जन्म देण्यात आला. असाच काहीसा प्रकार जम्मू-काश्मीरमध्ये घडला आहे. हिमवृष्टीमुळे, जम्मू आणि काश्मीरच्या दुर्गम केरनमध्ये बर्फवृष्टीमुळे प्रसूतीमध्ये अडचणी येत असलेल्या गर्भवती महिलेला डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलद्वारे निरोगी बाळाला जन्म देण्यास मदत केली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
या संदर्भात क्रालपोरा ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. मीर मोहम्मद शफी म्हणाले की, "शुक्रवारी रात्री, आम्हाला केरन पीएचसी (प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे प्रसूतीसीठी एक महिला आली होती. तिच्यामध्ये यापूर्वी प्रसूती करताना मोठी गुंतागुंत झाली होती. बर्फष्टीमुळे केरन कुपवाडा जिल्ह्याच्या उर्वरित भागापासून तुटलेला असल्याने महिलेला हवाई मार्गाने नेण्याची गरज होती. मात्र, सततच्या हिमवृष्टीमुळे प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रसूतीमध्ये मदत करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यास भाग पडले.
क्रालपोरा उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ डॉ. परवेझ यांनी केरन PHC मधील डॉ. अर्शद सोफी आणि त्यांच्या पॅरामेडिकल कर्मचार्यांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे प्रसूतीची प्रक्रिया समजावून सांगितली. डॉक्टर शफी यांनी सांगितले की रुग्णाला सामान्य प्रसूतीसाठी प्रवृत्त केले गेले आणि सहा तासांनंतर एक निरोगी मुलगी जन्माला आली. सध्या बाळ आणि आई दोघेही निरीक्षणाखाली असून दोघांचीही प्रकृती ठीक आहे.
असाच काहीसा प्रसंग 3 इडियट्स या चित्रपटात दाखवण्यात आला होता. या चित्रपटातही व्हिडीओ कॉलद्वारे महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली होती. असाच प्रकार जम्मू-काश्मीरमध्ये घडला. जम्मू-काश्मीरमधील या यशस्वी प्रसूतीबद्दल सर्वच कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Online Medicine App : विनापरवाना औषधं विकणं महागात, ई-फार्मसींना DCGI ची कारणे दाखवा नोटीस