Jammu Drone Attack : बिथरलेल्या पाकिस्तानचा जम्मू, सांबामध्ये हल्ल्याचा प्रयत्न, भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं 8 मिसाईल पाडल्या
Jammu Black Out : भारतानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर जम्मूवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे, अशी माहिती आहे.

जम्मू : भारताच्या मिशन सिंदूरनंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारतानं एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमद्वारे काल रात्री 15 लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न अयशस्वी केला होता. भारतानं लाहोरमधील पाकिस्तानची एचक्यू 9 डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त केली होती. आज जम्मू मध्ये हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतानं धडाकेबाज कामगिरी करत हाणून पाडला आहे. भारतानं पाकिस्तानच्या 8 मिसाईल पाडल्याची माहिती आहे.
भारतानं जम्मूतील हल्ल्याचा प्रयत्न उधळला
भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं जम्मूतील हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला आहे. भारतानं पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स पाडले आहेत. भारताच्या एस-400 सिस्टीमद्वारे पाकिस्तानचे ड्रोन्स नेस्तनाबूत केले आहेत. भारतानं जम्मू विद्यापीठाजवळ दोन ड्रोन पाडण्यात आले आहेत. पाकिस्ताननं जम्मूवर 8 मिसाईल डागल्या होत्या, मात्र, भारतानं त्या सर्व मिसाईल भारतानं हाणून पाडल्या आहेत.
पाकिस्ताननं जममू येथील एअरस्ट्रिपवर रॉकेट डागलं होतं. भारतानं हा हल्ला परतवला आहे. भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानच्या 8 मिसाईल पाडल्या आहेत. त्याचवेळी पाकिस्ताननं सांबा भागात गोळीबार देखील सुरु केला आहे. जम्मूच्या आरएस पुरा भागात ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. जम्मू मध्ये मोबाईल नेटवर्क देखील व्यवस्थितपणे काम करत नसल्याची माहिती आहे.
पाकिस्तानकडून करण्यात असलेल्या ड्रोनच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. भारतानं पाकिस्तानचे ड्रोन नेस्तनाबूत केले आहेत. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं मिसाईल हवेतल्या हवेत पाडले आहेत. पाकिस्ताननं जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. जैसलमेर येथील हल्ला भारतानं परतावून लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पठाणकोट एअरबेसवर देखील सायरनचा आवाज ऐकण्यात आला आहे. पठाणकोटमध्ये हलका सुजानपूरमध्ये ड्रोन दिसला होता, त्यानंतर आर्मीनं ड्रोनवर अटॅक केला.
जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील शहरांमध्ये पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारताच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे ड्रोन पाडले आहेत. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये देखील ब्लॅक आऊट करण्यात आला आहे. पाकिस्ताननं पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे.
























