भारतीय 'जेम्स बॉन्ड'! जाणून घ्या अजित डोवाल यांच्या वादळी कारकीर्दी विषयी
Ajit Doval Birthday : अजित डोवाल निवृत्त आयपीएस अधिकारी असून ते सध्या भारताचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
![भारतीय 'जेम्स बॉन्ड'! जाणून घ्या अजित डोवाल यांच्या वादळी कारकीर्दी विषयी James Bond Of India A Look Back At NSA Ajit Dovals Successful Missions On His 77th Birthday भारतीय 'जेम्स बॉन्ड'! जाणून घ्या अजित डोवाल यांच्या वादळी कारकीर्दी विषयी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/05/1396b0ae0e3fee586c35867cf5052cdd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ajit Doval Birthday : भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांचा आज वाढदिवस आहे. अजित डोवाल यांना भारतीय जेम्स बॉन्ड म्हणूनही ओळखले जाते. अजित डोवाल निवृत्त आयपीएस अधिकारी असून ते सध्या भारताचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. 31 मे 2014 पासून ते देशाचे राष्ट्रीय सल्लागार असून ते पाचवे देशाचे राष्ट्रीय सल्लागार आहेत. अजित डोवाल 1968 च्या केरळ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. 1972 मध्ये अजित डोवाल आयबीमध्ये रुजू झाले. गुप्तचर विभागात असताना पाकिस्तानच्या लाहोरमध्ये 7 वर्षे ते मुस्लीम बनून राहिले होते. अजित डोवाल एकमेव पोलीस अधिकारी आहेत की ज्यांना किर्तीचक्र आणि शांतीकाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या मास्टरमाईंडला भारताचा चाणक्य ही उपमा दिली तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. अजित डोभाल असं या शत्रूच्या काळजाला धडकी भरवणाऱ्या व्यक्तिचं नाव आहे.
डोभाल यांचं वय 77 वर्षे आहे, मात्र कामगिरी तरुणालाही लाजवणारी आहे. ऑपरेशन पीओकेनंतर भारताचा हा एक्का पुन्हा एकदा सिद्ध झाला. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचं श्रेय डोवाल यांना दिलं जातं. ऑपरेशन पीओकेआधी जून 2015 मध्ये ऑपरेशन म्यानमार हे एक असंच ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. अजित डोभाल हेच नाव या ऑपरेशनचं मास्टर माईंड होतं. म्यानमारच्या हद्दीत तब्बल 2 किलोमीटर आत घुसून 100 फुटीरतावाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. 4 जून 2015 ला मणिपूरच्या चंदेलमध्ये 18 जवानांच्या बलिदानाचा हा बदला होता.
तगडा अनुभव पाठीशी
इंदिरा गांधींसोबत अजित डोभाल यांना कामाचा अनुभव
अटलबिहारी वाजपेयी यांनाही अजित डोभाल यांची साथ
आजही पंतप्रधान मोदींच्या दहशतवादविरोधी मोहिमेचा हुकमी चेहरा
50 पेक्षा जास्त वर्षांची सेवा, एकही कामगिरी फ्लॉप नाही
अजित डोभाल यांचा खडतर प्रवास -
अजित डोभाल यांच्या या कामगिरीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्या-आल्या अजित डोभाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. अजित डोभाल यांचा हा प्रवास कठिण होता. 1968 साली अजित डोभाल आयपीएस झाले. एकूण कारकिर्दीत त्यांनी अनेक वर्ष हेर म्हणूनच काम केलं. अजित डोभाल भारताची गुप्तचर संस्था रॉचे अंडर कव्हर एजंट होते. डोभाल 7 वर्ष लाहोरमध्ये पाकिस्तानी मुस्लिम बनून राहिले. पाकिस्तानमधील वास्तव्यात तिथल्या नसा-नसात असलेला दहशतवाद त्यांनी अगदी जवळून पाहिला. पीओके ऑपरेशनचं यश याच अनुभवाचं फलित होतं, म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
अजित डोभाल यांची यशस्वी कारकीर्द
1999 च्या कंधार विमान अपहरण प्रकरणातील चर्चेत महत्त्वाची भूमिका
आईसी 814 विमानातील 176 प्रवाशांची सुखरुप सुटका
80 च्या दशकात मिझो नॅशनल आर्मीच्या दहशतवाद्यांचा खात्मा
या पराक्रमामुळे इंदिरा गांधींकडून भारतीय पोलीस पदक प्रदान
पोलीस पदकासाठी 17 वर्षांची अट असताना 6 व्या वर्षीच सन्मान
सेनेचे अधिकारी नसतानाही 1988 मध्ये कीर्ति चक्र सम्मान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)