बढती मिळालेल्या IPS अधिकाऱ्याने सफाई कर्मचाऱ्यांकडून वर्दीवर स्टार लावून घेतले!
पदोन्नतीचं वेगळं महत्त्व असतं आणि त्याचा आनंद साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी असते. प्रमोशनाचा आनंद राहुल प्रकाश यांनी समानतेचा संदेश देऊन साजरा केला.

जयपूर : सन्मान किंवा पुरस्कार मिळणं ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खास गोष्ट असते. आपल्याला एखाद्या खास व्यक्तीकडून पुरस्कार मिळावा अशी अनेकांची इच्छा असते. राजस्थानमधील जयपूरचे पोलिस अधिकारी राहुल प्रकाश यांनी असंच एक उदाहरण जगासमोर ठेवलं. त्यांचं प्रमोशन झालं. डीसीपी पदावरुन त्यांना डीआयजी म्हणजेच पोलिस उपमहानिरीक्षकपदी (वाहतूक) बढती मिळाली. समानतेचं उदाहरण देण्यासाठी त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांकडून आपल्या वर्दीवर पदोन्नतीचे स्टार लावून घेतले.
राहुल प्रकाश यांचं 31 डिसेंबर 2019 रोजी प्रमोशन झालं. डीसीपी पदावरुन डीआयजी पदावर (वाहतूक) त्यांना पदोन्नती मिळाली. पदोन्नतीचं वेगळं महत्त्व असतं आणि त्याचा आनंद साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी असते. प्रमोशनाचा आनंद त्यांनी समानतेचा संदेश देऊन साजरा केला. पदोन्नतीचे स्टार त्यांनी वाहतूक नियंत्रण कक्षात सफाई करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांकडून लावून घेतले.आयुक्त आस्तिक कुमार पांडेंची दणक्यात सुरुवात, पुष्पगुच्छ देणाऱ्या अधिकाऱ्यालाच 5 हजारांचा दंड
एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने डीआयजी पदावर बढती मिळाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांकडून शोल्डर बॅज लावण्याची राजस्थानमधील कदाचित ही पहिलीच वेळ असावी. "तुमच्याकडून सन्मानित होणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे," अशा भावना राहुल प्रकाश सफाई कर्मचाऱ्यांकडे व्यक्त केल्या. या घटनेनंतर वाहतूक विभागात राहुल प्रकाश यांची जोरदार चर्चा आहे.
लोकांमध्ये विशेषत: पोलिस दलात समानतेचा संदेश जावा. तसंच कोणी कोणाला उच्च-नीच समजू नये, यासाठी सफाई कर्माचाऱ्यांकडून वर्दीवर स्टार लावून घेण्याचा निर्णय राहुल प्रकाश यांनी घेतला. एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने सफाई कर्मचाऱ्यांकडून शोल्डर बॅज लावून घेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. स्टार लावून घेतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वच राहुल प्रकाश यांचं कौतुक करत आहेत.Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती






















