Jail Premier League: आता तुरुंगातही क्रिकेटचं मैदान, IPL च्या धर्तीवर JPLचं आयोजन; कैद्यांकडून चौकार-षटकारांची धुव्वादार फलंदाजी
Jail Premier League: तुरुंग प्रशासनाने सांगितले, कैदी खूप तणावाखाली असतात, अनेक वेळा त्यांना जामीन दिला जात नाही. अशा काळात मथुरेच्या जेलमध्ये IPL च्या धर्तीवर JPL चं आयोजन करण्यात आलं होते.

Jail Premier League: चार भिंतीत राहणाऱ्या कैद्यांचे मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांचा ताण कमी करण्यासाठी मथुरा तुरुंग प्रशासनाने अनोखा उपक्रम सुरु केलाय. आयपीलच्या धर्तीवर मथुरा जेलमध्ये जेल प्रीमियर लीग सुरु करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशच्या मथुरेत आता चौकार षटकाराचा पाऊस पडत असून कैद्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी, त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानसिक ताणापासून मुक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचं मथुरा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मथुरेच्या तुरुंगातील कैद्यांचा क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. (Jail Premier League)
आता तुरुंगातही क्रिकेटचं मैदान
या व्हिडिओमध्ये तुरुंगाच्या आवारातील एका मैदान फुग्यांनी सजवण्यात आले आहे. या मैदानात कैद्यांचा जेल प्रीमियर लीग चांगलाच रंगल्याचे दिसले. एकूण आठ संघांनी या लीगमध्ये भाग घेतला होता. महिनाभर चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाईट रायडर्स या संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव केला. गेल्या एक महिन्यापासून मथुरा येथे जेल प्रीमियर लीग 2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्यात आठ संघांनी भाग घेतला होता, प्रत्येकी चार संघांना गट अ आणि गट ब मध्ये स्थान देण्यात आले होते. असे तुरुंग प्रशासनाने सांगितले.
#WATCH | Uttar Pradesh | To enhance the talent of the prisoners, improve their physical health and relieve them from mental stress, Jail Premier League was organized on the lines of IPL among the prisoners in Mathura Jail pic.twitter.com/ACofTYmRgi
— ANI (@ANI) May 15, 2025
शुमन गर्ग यांनी सांगितले की, या स्पर्धेत एकूण 15 सामने आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेचे स्वरूप इंडियन प्रीमियर लीगवर आधारित होते. जिल्हा कारागृह मथुरा येथील सर्व कैद्यांना ते खूप आवडले. एकूण 130 कैद्यांनी यात भाग घेतला आणि उर्वरित कैद्यांनी प्रेक्षक म्हणून आनंद घेतला. भूराला ऑरेंज कॅप देण्यात आली, तर पंकजला पर्पल कॅप देण्यात आली.
कैद्यांच्या मानसिक आरोग्यासाठी तुरुंग प्रशासनाचे पाऊल
तुरुंग प्रशासनाने सांगितले, कैदी खूप तणावाखाली असतात, अनेक वेळा त्यांना जामीन दिला जात नाही. काही कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटू दिले जात नाही. अशा परिस्थितीत, कैद्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी खेळ हे एक चांगले माध्यम आहे. आम्ही खेळांच्या माध्यमातून बंधुता वाढवतो. यामुळे कैद्यांमध्येही एकता दिसून येते. आम्ही भविष्यातही अशा स्पर्धा आयोजित करत राहू.
हेही वाचा:
गृह विभागाचा मोठा निर्णय, पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार; राजपत्र जारी























