मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, अचानक राजीनामा देण्याचं कारण काय?
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Voice President jagdeep Dhankhar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

— Vice-President of India (@VPIndia) July 21, 2025
संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाता राजीनामा दिला आहे. दरम्यान, अचानक जगदीप धनखड यांना राजीनामा दिल्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु आहेत. संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे असे धनखड म्हणाले. या परिवर्तनकारी युगात देशाची सेवा करणे माझ्यासाठी खास सन्मान आहे. हे पद सोडताना, भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो असे धनखड यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या म्हटलं आहे.
मार्च महिन्यात जगदीप धनखड यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते
मार्च महिन्यात जगदीप धनखड यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयाशी संबधीत इन्फेक्शन झाल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रुग्णालयात जाऊन जगदीप धनखड यांची भेट घेतली होती. दरम्यान, आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी राजीनामा दिला आहे. 11 ऑगस्ट 2022 रोजी जगदीप धनखड यांनी देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.
महत्वाच्या बातम्या:
Supreme Court vs Governors : कायद्याचा खेळखंडोबा करणाऱ्या राज्यपालांना फटकारत सुप्रीम कोर्टाची राष्ट्रपतींना डेडलाईन; आता उपराष्ट्रपती म्हणाले, न्यायालये राष्ट्रपतींना आदेश देऊ शकत नाहीत























