News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

'नीट' रद्द नाही, जे पी नड्डांनी ठणकावलं, सरकारी कॉलेजचे प्रवेश CET नुसार

FOLLOW US: 
Share:
मुंबई : 'नीट' परीक्षेवरुन सुरु झालेला गोंधळ थांबला असं वाटत असतानाच,  आता तो आणखी वाढणार हे स्पष्ट झालं आहे. कारण 'केंद्र सरकारने यंदा 'नीट' रद्द केलेली नाही, गैरसमज करुन घेऊ नका' असं स्पष्ट शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे.   राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, केंद्राने अध्यादेश काढून यंदा 'नीट' मधून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल केक कापून सेलिब्रेशन केलं. तसंच आम्ही पाठपुरावा केल्यामुळे केंद्राने दखल घेतल्याची टिमकी वाजवली. मात्र केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी सर्वांना तोंडावर पाडल्याचं चित्र आहे.   इतकंच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बाईट देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले होते. याशिवाय विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधानांच्या आभाराचे ट्विट करत, अध्यादेशाची सर्वप्रथम मागणी आपण केल्याचा दावा केला होता.   त्यामुळे अध्यादेश न समजून घेता सेलिब्रेशन किंवा श्रेय घेण्याच्या चढाओढीत मूळ प्रश्नाकडेच दुर्लक्ष झाल्याचं उघड झालं आहे.   जे पी नड्डा नेमकं काय म्हणाले?   "केंद्र सरकार अध्यादेशाद्वारे 'नीट' परीक्षा रद्द करत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण ते तथ्यहीन आणि चुकीचं आहे. मी यापूर्वीही सांगितलं होतं, 'नीट' परीक्षा होणारच. परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला आहे, आता दुसरा टप्पा 24 जुलैला होणारच.   काही राज्यांचा 'नीट'ला विरोध होता, तो विषय चर्चेला आला होता. या चर्चेमध्ये तीन विषय होते, एक म्हणजे त्या-त्या राज्यांची सीईटी, दुसरं अभ्यासक्रम आणि तिसरं म्हणजे प्रादेशिक भाषांमध्ये पेपर..या मुद्द्यांबाबत सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाली.   या बैठकीसाठी काँग्रेसकडून जयराम रमेश उपस्थित होते. ज्या राज्यांचा 'नीट'ला विरोध आहे, त्यांना यंदा या परीक्षेतून सूट द्यावी अशी जयराम रमेश यांची मागणी होती. मात्र त्यांचंही मत हेच होतं की 'नीट' आवश्यक आहे आणि ती लागू व्हायलाच हवी.   या सर्व मुद्द्याबाबत अजून सल्लामसलत सुरुच आहे. पण मी सांगू इच्छितो की 'नीट' परीक्षा होणारच, त्यामधून सूट देण्यात आलेली नाहीच. परीक्षेचा दुसरा टप्पा 24 जुलैला होणारच. सध्या हिंदी आणि इंग्रजीत ही परीक्षा होणारच आहे.   त्यामुळे कोणीही 'नीट' परीक्षेवरुन संभ्रम निर्माण करु नये", असं आवाहन जे पी नड्डा यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या

'नीट'मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश!

'नीट' अध्यादेशाविरोधात संकल्प ट्रस्टची सुप्रीम कोर्टात धाव

Published at : 21 May 2016 04:12 AM (IST)

आणखी महत्वाच्या बातम्या

ICMR on Antibiotics : अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषध 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला!

ICMR on Antibiotics : अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषध 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला!

Madhya Pradesh : उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच अंत; जेसीबी, गॅस कटरने बस कापून प्रवाशांना बाहेर काढले

Madhya Pradesh : उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच अंत; जेसीबी, गॅस कटरने बस कापून प्रवाशांना बाहेर काढले

तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; उदयनिधि स्टॅलिन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; उदयनिधि स्टॅलिन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

मोठी बातमी! तांदळाबाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

मोठी बातमी! तांदळाबाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

स्पॅमच्या समस्येवर बसणार आळा, Airtel ने सादर केलं भारतातलं पहिलं AI नेटवर्क सोल्यूशन

स्पॅमच्या समस्येवर बसणार आळा, Airtel ने सादर केलं  भारतातलं पहिलं AI नेटवर्क सोल्यूशन

टॉप न्यूज़

अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला, उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफनविधी; 7 व्या दिवशी अंत्यविधी

अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला, उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफनविधी; 7 व्या दिवशी अंत्यविधी

Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Guru Vakri 2024 : तब्बल 12 वर्षांनंतर नवरात्रीत गुरु ग्रह वक्री; 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Rohit Pawar : काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Rohit Pawar : काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाच्या चालीत बदल; 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ

Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाच्या चालीत बदल; 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ