Aditya L1 Mission: आदित्य एल1 नं ISRO ला पाठवलाय सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचे फोटोही केलेत क्लिक
ISRO Solar Mission: चंद्रयान-3 नं चंद्रावर यशस्वी लँडिंग केलं त्यानंतर लगेचच इस्रोनं आपलं पहिलं सूर्य मिशन सुरू केलं.
Adtiya L1 Solar Mission: 2 सप्टेंबरला ISROचं आदित्य L1 अवकाशात झेपावलं आणि इस्रोनं देशाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला. आदित्य L1 (Aditya L1) बाबत इस्रोकडून सातत्यानं अपडेट्स शेअर करण्यात येत आहेत. त्याच्या प्रवासाचे फोटो आणि व्हिडीओ इस्रो आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर करत असतं. अशातच इस्रोनं आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये आदित्य एल1 नं काढलेला सेल्फी ट्वीट केला आहे. आदित्य एल1 सूर्याच्या दिशेने म्हणजेच, एल 1 पॉईंटकडे आपला प्रवास करत आहे. दरम्यान, सूर्य, पृथ्वी एल 1 पॉईंटसाठी जाणाऱ्या आदित्य-एल1 नं पृथ्वी आणि चंद्राचे सेल्फी आणि काही फोटो काढले आहेत.
इस्रोनं दुसऱ्यांदा आदित्य L-1 ची कक्षा वाढवली आहे. आता आदित्य L-1 पृथ्वीपासून 40 हजार 225 किलोमीटवर पोहोचलंय. 10 सप्टेंबरला तिसरा थ्रस्टर फायर करून आदित्य L-1 च्या कक्षेत तिसऱ्यांदा वाढ केली जाणार आहे. इस्रोचं आदित्य L-1 दोन सप्टेंबर रोजी सूर्याकडे झेपावलं. त्यानंतर 24 तासांतच आदित्य L-1 ची कक्षा पहिल्यांदा वाढवण्यात आली. त्यानंतर आज पहाटे पावणेतीन वाजता आदित्य L-1 ची कक्षा वाढण्यात आली आहे. आदित्य L-1 एकूण 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार असून पाचवेळी थ्रस्टर फायर करून कक्षा वाढवणार आहे.
Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) September 7, 2023
👀Onlooker!
Aditya-L1,
destined for the Sun-Earth L1 point,
takes a selfie and
images of the Earth and the Moon.#AdityaL1 pic.twitter.com/54KxrfYSwy
2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C57 च्या XL आवृत्ती रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. प्रक्षेपणाच्या 63 मिनिटं 19 सेकंदांनंतर, अंतराळयान पृथ्वीच्या 235 किमी x 19500 किमीच्या कक्षेत ठेवण्यात आले.
इस्रोनं 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून सौर मोहीम प्रक्षेपित केली. आदित्यचे 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C57 च्या XL आवृत्ती रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाच्या 63 मिनिटे 19 सेकंदांनंतर, अंतराळयान पृथ्वीच्या 235 किमी x 19500 किमीच्या कक्षेत ठेवण्यात आले.
दरम्यान, आदित्य L1 हे सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान L1 बिंदूपर्यंत जाणार आहे. प्रक्षेपणानंतर ते पोहोचण्यासाठी 125 दिवस लागतील. त्यानंतरच आदित्य एल1 सूर्यावर संशोधन सुरू करू शकेल. त्याचबरोबर चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचल्यानंतर दीर्घ संशोधन करावं लागेल. यासोबतच इस्रो आणखी अनेक मोहिमा सुरू करणार आहे. ज्यामध्ये शुक्र आणि गगनयान मोहिमा पाईपलाईनमध्ये आहेत. शुक्र हा अंतराळातील एकमेव ग्रह आहे जो जवळजवळ पृथ्वीसारखा आहे, असं म्हटलं जातं.