एक्स्प्लोर
Advertisement
आयआरसीटीसी घोटाळा : लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर
आयआरसीटीसी घोटाळाप्रकरणी आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोर्टाने माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना 1 लाख रुपये जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला आहे.
अमृतसर : आयआरसीटीसी घोटाळाप्रकरणी आज पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोर्टाने माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांना 1 लाख रुपये जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला आहे.
लालूप्रसाद यादव न्यायाधीशांना म्हणाले की, "कोर्टाने दिलेल्या तारखेप्रमाणे मी हजर झालो आहे. मला ताब्यात घेण्याची काहीही आवश्यकता नाही. यापुढेही दिलेल्या तारखेला मी हजर राहीन. या प्रकरणातील सारे दस्तावेज अगोदरच जप्त केले आहेत. कोणत्याही साक्षीदाराच्या जिवितास धोका नाही. तसे असते तर ईडीने कोर्टाला याबाबत माहिती दिली असती. तसेच मी 69 वर्षांचा झालो आहे, हल्ली माझी तब्येत बरी नसते. त्यामुळे कोर्टाने माझा जामीन मंजूर करावा."
दरम्यान ईडीने लालूंच्या जामीनाचा विरोध करताना म्हटले की, "लालूंचा अपराध हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम करणारा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यामुळे धोका आहे. केवळ आम्ही गुन्हेगारांना अटक केलेली नाही, ही गोष्ट त्यांना जामीन देण्याचा आधार ठरु शकत नाही."
तपास यंत्रणेने म्हटले आहे की, "लालूंना जामीन मंजूर झाला तर साक्षीदारांवर दबाव टाकला जाईल. काही साक्षीदार हे त्यांचे कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे सध्या चौकशी सुरु आहे."
Delhi's Patiala House Court grants regular bail to former Union Railway Minister Laloo Prasad Yadav in case filed by CBI in IRCTC matter. Bail has been granted to him Rs 1 lakh personal bail bond & one surety like amount.
— ANI (@ANI) January 19, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
अहमदनगर
Advertisement