एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

INX Media Case : पी चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

सीबीआयने म्हटले आहे की, 26 ऑगस्टला त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोर्टासमोर आणले जाईल. पी चिदंबरम यांच्या ईडीच्या याचिकेवर 27 ऑगस्टला सुनावणी होईल तर सीबीआय विरुद्ध चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या, शुक्रवारी सुनावणी होईल.

नवी दिल्ली :  देशाचे माजी गृह आणि अर्थमंत्री पी.चिदंबरम  यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश सीबीआय कोर्टाने दिले आहेत. राजधानी दिल्लीत बुधवारी रात्री घडलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर देशाचे माजी गृह आणि अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय मुख्यालयात रात्रभर चौकशी केल्यानंतर, आज त्यांना कोर्टात हजर केलं होतं. या संपूर्ण व्यवहाराची पूर्ण माहिती विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी चिदंबरम यांच्याकडून माहिती घेणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना कोठडी द्यावी अशी मागणी सीबीआयने केली होती. ही मागणी मान्य करत  सीबीआय कोर्टाने चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत चार दिवसासाठी सीबीआय कोठडी सुनावली आहे. आदेश देताना कोर्टाने म्हटलं आहे की, चिदंबरम यांची जी काही चौकशी करायची आहे ती या चार दिवसात पूर्ण करावी. सोबतच या काळात रोज अर्ध्या तासासाठी त्यांचा परिवार आणि वकील त्यांना भेटू शकतील असेही कोर्टाने म्हटले आहे. चार दिवसानंतर सोमवारी, 26 ऑगस्टला पुन्हा त्यांना कोर्टासमक्ष आणले जाईल.   सीबीआयने म्हटले आहे की, 26 ऑगस्टला त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोर्टासमोर आणले जाईल. पी चिदंबरम यांच्या ईडीच्या याचिकेवर 27 ऑगस्टला सुनावणी होईल तर सीबीआय विरुद्ध चिदंबरम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या, शुक्रवारी सुनावणी होईल. दोन तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर पी. चिदंबरम यांना अटक, राडा करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी पी.चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. तब्बल दोन तासांच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने त्यांना बेड्या ठोकल्या. यावेळी चिदंबरम यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला. परिणामी सीबीआयने दिल्ली पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावं लागलं होतं. आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या रडारवर असलेले पी. चिदंबरम काही काळ बेपत्ता होते. ते थेट काल रात्री माध्यमांसमोर आले. त्यांनी रात्री 8.15 वाजता नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांचं खंडन केलं. चिदंबरम यांच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, गेटवरुन उड्या मारुन सीबीआय पथक घरात चिदंबरम माध्यमांसमोर येताच सीबीआयचं पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात पोहोचलं. परंतु चिदंबरम सीबीआयच्या हाती लागले नाहीत. उलट ते घरी पळाले. सीबीआयसोबतच ईडीची टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोहोचली. परंतु सीबीआयला चिदंबरम यांच्या घरात जाण्याची परवानगी मिळाली नाही. परिणामी सीबीआयच्या पथकाला चिदंबरम यांच्या घराच्या प्रवेशद्वारावरुन (गेटवरुन), भिंतीवरुन उड्या मारुन घरात प्रवेश करावा लागला. त्यानंतर सीबीआयच्या टीमने चिदंबरम यांना ताब्यात घेतलं. रात्री 10.15 वाजता चिदंबरम यांना अटक झाली. INX Media Case | पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा नाही चिदंबरम यांनी त्यांच्या घराचा दरवाजा न उघडल्याने सीबीआयने अक्षरशः कसरत करुन निवासस्थानाच्या गेटवर चढून निवासस्थानी प्रवेश केला. दरम्यान यामुळे निवासस्थानाबाहेर परिस्थिती चिघळली होती. चिदंबरम यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते. काँग्रेस कार्यकर्ते सीबीआय आणि ईडीच्या कारवाईत अडथळा आणत होते. कार्यकर्त्यांनी राडा सुरु केल्यानंतर सीबीआयने दिल्ली पोलिसांकडे मदत मागितली. दिल्ली पोलिसांनी या राडा करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड केली. काय आहे प्रकरण? UPA-1 सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या काळात एफआयपीबीने दोन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. अर्थमंत्री असताना चिदंबरम यांच्या कार्यकाळात 2007 मध्ये 305 कोटी रुपयांचं परदेशी चलन मिळवण्यासाठी आयएनएक्स मीडिया समूहला दिलेल्या एफआयपीबी मंजुरीत अनियमितता झाली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने 15 मे 2017 रोजी प्राथमिक गुन्ह्याची नोंद केली होती. तर ईडीने मागील वर्षी या संबंधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. 27 तासांनंतर पी. चिदंबरम माध्यमांसमोर, म्हणाले माझ्यावरील आरोप खोटे ज्या दोन कंपन्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर केली होती, त्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्या आहेत. त्यामुळे कार्ती यांच्या हस्तक्षेपानंतर आयएनएक्स मीडियाला एफआयपीबी मंजुरी देण्यात आली असावी, असा दावा ईडीने केला आहे. तसंच एफआयपीबीच्या मंजुरीसाठी आयएनएक्स मीडियाचे पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांनी पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती, जेणेकरुन वाटपात कोणताही विलंब होऊ नये, असं ईडीच्या तपासात आतापर्यंत समोर आलं आहे. या प्रकरणात सीबीआयने त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना 28 फेब्रुवारी 2018 रोजी अटक केली होती, जे सध्या जामिनावर बाहेर आहेत. 2007 मध्ये आयएनएक्स मीडियाला एफआयपीबी मंजुरी मिळवून देण्यासाठी कथितरित्या लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हाईकोर्टने 25 जुलै 2018 रोजी चिदंबरम यांना दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला होता, जो वेळोवेळा वाढवला होता. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी (20 ऑगस्ट) अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मात्र चिदंबरम यांनी या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. बुधवारी सकाळी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एन व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अटकेपासून दिलासा देण्यास नकार देत, त्यांची याचिका तात्काळ सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवली. तपास यंत्रणांनी चिदंबरम यांच्या जामीन अर्जाचा विरोध करत म्हटलं की, तपासासाठी त्यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे. कारण चौकशीत चुकीची माहिती दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर Superfast News ABPमाझाSanjay Raut Mumbai : रश्मी शुक्ला, अदानी ते महायुती सरकार;संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाTop 90 At 9AM 26 November 2024 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Embed widget