एक्स्प्लोर
Advertisement
गोव्याच्या राजकारणात विजय सरदेसाईंचा मास्टरस्ट्रोक
पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या बाबुश मोन्सेरात यांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून होते, त्या मोन्सेरात यांना गोवा फॉरवर्डमध्ये आणून नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या राजकारणात मोठा मास्टर स्ट्रोक मारला आहे.
पणजी (गोवा) : काँग्रेसच्या बाबुश मोन्सेरात यांना गोवा फॉरवर्ड पार्टीत आणून विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या राजकारणात मास्टरस्ट्रोक मारला आहे. पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून बाबुश मोन्सेरात यांना उतरवण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र, त्याआधीच विजय सरदेसाई यांनी मोठी खेळी खेळून सर्वच राजकीय गणितं बदलून टाकली आहेत.
काँग्रेसकडून फारशा अपेक्षा ठेवण्यासारखी परिस्थिती नसल्याने गोव्याच्या विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करणाऱ्या गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करणे कधीही चांगले आहे, असे सांगत मोन्सेरात यांनी गोवा फॉरवर्डमधील प्रवेशाचे समर्थन केले.
मोन्सेरात यांचा उत्तर गोव्यात जबरदस्त प्रभाव असल्याने गोवा फॉरवर्डची ताकद तर वाढेलच, शिवाय भाजपकडून पणजीची पोटनिवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासाठी निवडणूक सोपी करण्यात आम्ही सिंहाचा वाटा उचलला, अशा शब्दात सरदेसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मोन्सेरात यांना पर्रिकर यांच्या विरोधात पोटनिवडणुकीत उतरवण्याचा विचार काँग्रेसने चालवला होता. काँग्रेस नेत्यांनी मोन्सेरात यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न चालवला होता. सरदेसाई यांनी बाजी मारत मोन्सेरात यांना गोवा फॉरवर्डमध्ये आणल्यामुळे काँग्रेसचे मनसुभे उधळले गेले आहेत.
मोन्सेरात यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या राजकीय वाटचालीत ते अडथळे ठरत होते. मोन्सेरात आता सत्ताधारी भाजप आघडीतील घटक पक्षाचा भाग बनल्याने त्याचा त्यांना राजकीय फ़ायदा होईल अशी चर्चा रंगू लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement