एक्स्प्लोर

शक्तिशाली युद्धनौका 'विराट' आज निवृत्त

मुंबई: 30 वर्षे भारतीय नौदलाची शक्तीस्थळ म्हणून मिरवणारी आयएनएस विराट ही विमानवाहू युद्धनौका आज निवृत्त होत आहे. नौदलाच्या मुंबई गोदीत त्यासाठी एका विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अजस्त्र युद्धनौकेचं सारथ्य करणाऱ्या भारतीय आणि ब्रिटिश नौदलातील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आलं आहे. भारताच्या नाविक सामर्थ्याचे प्रतिक बनलेली आयएनएस विराट १९८७ साली भारतीय नौदलात दाखल झाली होती. तत्पूर्वी २७ वर्षे ती ‘एचएमएस हरमीस’ या नावाने ब्रिटिश नौदलाच्या ताफ्यात कार्यरत होती. भारतानं 1987 साली ब्रिटनकडून ही युद्धनौका खरेदी केली होती. निवृत्तीनंतर आयएनएस विराटचे रूपांतर संग्रहालयात करण्याची मागणी सध्या केंद्र सरकारच्या स्तरावर विचाराधीन आहे. काय आहे विराटची ताकद: ins-viraat2 जवळजवळ 24 हजार टन वजनाच्या 'विराट'ची लांबी 740 फूट आणि रुंदी 160 फूट एवढी आहे. यावर तब्बल 1500 नौसैनिक कायम तैनात असतात. विराटवर एकावेळी तीन महिने पुरेल एवढं खाद्या सामुग्री असते. कारण की, विराट एकदा समुद्रात गेल्यावर 90 दिवसांपर्यंत दुसऱ्या बंदरावर जात नाही. यावर तैनात असणारे सी-हॅरिअर लढाऊ विमान आणि सीकिंग हेलिकॉप्टर हे विराटची ताकद कैकपटीनं वाढवतात. कोणत्याही देशाच्या नौदलाची ताकद असते ती तिची विमान वाहक युद्धनौका. ज्या देशांकडे अशाप्रकारच्या शक्तीशाली युद्धनौका असतात. त्यांची समुद्रातील ताकद हजारो पटीनं वाढते. या युद्धनौका म्हणजे चालते-फिरते किल्लेच असतात. या युद्धनौकांवर मिग, सुखोई, मिराज इ. लढाऊ विमानं असतात. ज्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर शत्रूला नेस्तनाबूत करु शकतात. ही युद्धनौकेवरील असणारा डेक या जवळजवळ दोन ते तीन फुटबॉल मैदानाइतका मोठा असतो. जिथून यावरील लढाऊ विमानं उड्डाण करतात. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की, ही यौद्धनौका नेमकी किती मोठी असते. किती महाग असतात युद्धनौका: ins-viraat1 एक युद्धनौका प्रचंड महाग असते. (जवळजवळ 20 हजार कोटीपासून 50 ते 60 हजार कोटी एवढी त्याची किंमत असते) त्याची देखभाल करणं देखील तेवढचं महागडं असतं. यासाठी जवळजवळ वर्षाला 100 कोटी खर्च असतो. जोवर या युद्धनौका सक्षम असतात तोवर त्याचा खर्च उचलला जातो. पण जेव्हा या युद्धनौका निवृत्त होतात. त्यावेळी त्याची देखभाल करण्यासाठी बराच खर्च असतो. त्यामुळेच मागील वर्षी संरक्षण मंत्रालयानं सर्व सागरी किनारपट्टी असलेल्या राज्यांना पत्र लिहून विराटचं म्युझियम व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विराट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणमध्ये पहिल्यापासूनच पाणबुडीचं म्युझियम आहे. दरम्यान, याआधी 'आयएनएस विक्रांत' निवृत्त झाल्यानंतर तिला भंगारात विकण्यात आलं होतं. त्यानंतर देशभरातून याविषयी बरीच टीका करण्यात आली होती. विक्रांत ही 17 वर्षापूर्वी नौदलातून निवृत्त झाली होती. भारतीय नौदलात 'विक्रांत' केव्हा आली? ins-virat भारतानं आयएनएस विक्रांत ब्रिटनकडून 60च्या दशकात खरेदी केली होती. त्यानंतर भारतीय नौदलात 30 ते 35 वर्ष काम केल्यानंतर विक्रांतला 1998 साली निवृत्त करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील 17 वर्ष म्हणजेच 2015 सालापर्यंत ती मुंबई डॉकयार्डमध्ये उभी होती. त्यावेळी याच्या देखभालीसाठी जवळजवळ 100 कोटी खर्च होत होता. त्यामुळे विक्रांतला भंगारात विकण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामनेBaramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget