एक्स्प्लोर

भारतात श्रीमंतांची संख्या 7300 ने वाढली : अहवाल

एका अहवालानुसार, भारतात या श्रेणीतील श्रीमंतांची संख्या 3.43 लाखापर्यंत पोहोचली आहे. या लोकांची एकूण संपत्ती सहा हजार अब्ज डॉलरच्या आसपास आहे. श्रीमंतांची संख्या वाढली असली तरी श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : भारतात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी ही नेहमीच चिंतेची बाब राहिलेली आहे. याचदरम्यान एक अहवाल आला आहे. जून 2017 ते जून 2018 पर्यंत देशात दहा लाख डॉलर म्हणजे 7.3 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या श्रीमंतांची संख्या 7300 ने वाढली आहे. एका अहवालानुसार, भारतात या श्रेणीतील श्रीमंतांची संख्या 3.43 लाखापर्यंत पोहोचली आहे. या लोकांची एकूण संपत्ती सहा हजार अब्ज डॉलरच्या आसपास आहे. आर्थिक सेवा कंपनी क्रेडिट सुसीचा हा अहवाल आहे. या अहवालानुसार, भारत सर्वाधिक महिला अब्जाधीशांची संख्या (एक अब्ज डॉलर म्हणजेच 73.5 अब्ज रुपये) असणारा देश आहे. या अभ्यासादरम्यान जगातील 18.6 टक्के अब्जाधीश महिला या एकट्या भारतात आहेत, असं आढळून आलं. या अहवालानुसार, जून 2018 पर्यंत देशात 10 लाख डॉलर किंवा त्यापेक्षा अधिकची संपत्ती असणाऱ्या श्रीमंतांची संख्या 343000 राहण्याचा अंदाज आहे. गेल्या एका वर्षात या श्रेणीतील श्रीमंतांची संख्या 7300 ने वाढली आहे. नव्या श्रीमंतांमध्ये 3400 जणांची संपत्ती पाच कोटी डॉलर (जवळपास 36.5 कोटी रुपये) आणि 1500 जणांची संपत्ती 10 कोटी डॉलर (जवळपास 73 कोटी रुपये) पेक्षा अधिक आहे. या काळात देशाच्या संपत्तीत 2.6 टक्क्यांची वाढ दिसून आली असून एकूण संपत्ती आता सहा हजार अब्ज डॉलर झाली आहे. पण प्रति व्यक्ती संपत्ती 7020 डॉलर एवढीच आहे. कारण, रुपयाची घसरण सुरुच आहे. या अहवालानुसार, 2023 पर्यंत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरक वाढणार आहे. ही असमानता 53 टक्क्यांच्या वर जाण्याचा अंदाज आहे. देशामध्ये 526000 असे श्रीमंत असतील, ज्यांची संपत्ती 8800 अब्ज डॉलर असेल आणि गरीब-श्रीमंतांच्या दरीत 53 टक्क्यांची वाढ होईल. भारतात वैयक्तिक संपत्ती जमीन आणि इतर अचल संपत्तीच्या रुपात आहे. कौटुंबीक संपत्तीमध्ये या संपत्तीचा एकूण 91 टक्के समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget